latest

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे

निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – खा.डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे | निसर्ग चक्रीवादळामुळे शिरूर लोकसभा मतदारसंघातील विविध तालुक्यात झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करा अशी मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी जिल्हाधिकारी श्री. नवल किशोर राम यांना पत्र पाठवून केली आहे.

आज निसर्ग चक्रीवादळाने मुंबई, कोकण परिसरात धडक दिल्यानंतर या चक्रीवादळाचा परिणाम पुणे जिल्ह्यात जाणवायला सुरुवात झाली होती. मात्र दुपारनंतर जोरदार वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक घरांवरील पत्रे व छप्परं उडून गेली. तसेच घरांचे, वाहनांचे व शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची तातडीने दखल घेऊन खासदार डॉ. कोल्हे यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना पत्र पाठवून नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश महसूल प्रशासनाला देण्याची मागणी केली आहे.

कोरोनाच्या संकटामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना निसर्ग चक्रीवादळामुळे मोठा फटका बसला असून त्यातून सावरण्यासाठी त्यांना प्रशासनाने मदत करण्याची गरज आहे असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

Read more...

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा ;घराबाहेर पडू नका – अजित पवार

वादळाचा जोर ओसरेपर्यंत सुरक्षित स्थळी थांबा ;घराबाहेर पडू नका – अजित पवार

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई दि.३| अरबी समुद्रात निर्माण झालेले ‘निसर्ग’ चक्रीवादळ आज दुपारपर्यंत महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीवर विशेषत: अलिबाग, पालघर परिसरात धडकण्याची शक्यता लक्षात घेऊन मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह किनारपट्टीवरील नागरिकांनी घरातच किंवा सुरक्षित ठिकाणी आसरा घेऊन थांबा. वादळाचा जोर ओसरेपर्यंत बाहेर पडण्याचा प्रयत्न करु नये असे आवाहन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

चक्रीवादळापासून जिवितहानी, वित्तहानी होऊ नये म्हणून प्रशासनाने संपूर्ण दक्षता घेतली आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांचे स्थलांतर करण्यात आले आहे. लाईफगार्ड, पोलिस, अग्निशमन दल, एनडीआरएफचे जवान सज्ज ठेवण्यात आले आहेत. आरोग्य यंत्रणा, स्थानिक प्रशासनही दक्ष आहे. राज्याची संपूर्ण यंत्रणा तत्पर असून आवश्यकतेनुसार तात्काळ मदत उपलब्ध करण्याचे नियोजन झाले आहे. या वादळाचा वेग आणि ताकद मोठी असल्याने नागरिकांनी सावध, सुरक्षित रहावे, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले आहे.

Read more...

उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांनी घेतला पुढाकार

उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी खा.अमोल कोल्हे यांनी घेतला पुढाकार

सजग वेब टिम, पुणे

पुणे | लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्यासाठी चाकण एमआयडीसीतील कंपन्यांना कामगार उपलब्ध करून देण्यासह विविध समस्या सोडविण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करणार अशा शब्दांत शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी आज फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीज (एफसीआय) समवेत आयोजित केलेल्या व्हिडिओ कॉन्फरन्स बैठकीत कंपनी प्रतिनिधींना आश्वस्त केले.

एका बाजूला लॉकडाऊन शिथिल करून कंपन्या सुरू करण्यास शासनाने परवानगी दिली असताना दुसऱ्या बाजूला राज्यातील व परराज्यातील हजारो कामगार त्यांच्या घरी परत गेले. त्यामुळे कंपन्यांना पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध होत नाही. शिवाय सतत बदलणारा कन्टेन्मेंट झोन लक्षात घेता उपलब्ध कामगारांना कामावर येताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन, एमआयडीसी व कामगार उपायुक्त कार्यालय आदींकडून योग्य माहिती व मार्गदर्शन कंपन्यांना मिळावे. तसेच त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांच्या पुढाकाराने आज फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजच्या सदस्य कंपन्यांच्या प्रतिनिधींची व्हिडिओ कॉन्फरन्स बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, पुण्याचे कामगार उपायुक्त शैलेंद्र पोळ, खेडचे प्रांत अधिकारी संजय तेली, एफसीआयचे दिलीप बटवाल, मोहन पाटील तसेच विविध कंपन्यांचे आदी उपस्थित होते.

कंपन्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी डॉ. कोल्हे यांनी घेतलेल्या पुढाकाराबद्दल सर्वच कंपनी प्रतिनिधींनी आनंद व्यक्त करताना त्यांच्यासमोर अनेक समस्या मांडल्या. यामध्ये प्रामुख्याने बाहेरून येणाऱ्या कामगारांचे १४ दिवस विलगीकरण करण्याची अट, बाहेरगावी गेलेल्या कायमस्वरूपी कामगारांना परत येण्यासाठी पोलीस परवानगी मिळण्यात येणारे अडथळे व पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध न होणे आदींचा समावेश होता. या सर्व प्रश्नांवर कामगार उपायुक्त श्री. पोळ, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी श्री. हदगल तसेच खेडचे प्रांत अधिकारी श्री. तेली यांनी समर्पक उत्तरे व माहिती देऊन मार्गदर्शन केले. एफसीआय व प्रशासन यांच्यात माहिती व शासनाचे वेळोवेळी निघणारी परिपत्रके व दररोज बदलणाऱ्या कन्टेन्मेंट झोनची माहिती यांचे आदानप्रदान करण्यासाठी एफसीआयने नोडल अधिकारी नियुक्त करावा असा निर्णय या बैठकीत घेण्यात आला.

पुरेसे मनुष्यबळ उपलब्ध व्हावे यासाठी एफसीआयला आवश्यक सहकार्य करण्यासाठी आपल्या वेबसाइटवर एक प्लॅटफॉर्म तयार करून स्थानिक परिसरातील व महाराष्ट्रातील विविध भागांतील तरुणांकडून अर्ज मागविले जातील. हे अर्ज एफसीआयच्या माध्यमातून कंपन्यांना पाठवले जातील. त्यातून कंपन्यांनी आपल्याला आवश्यक उमेदवारांची निवड करावी. या माध्यमातून मनुष्यबळाचा प्रश्न सोडवू शकतो या डॉ. कोल्हे यांच्या सूचनेचे सर्वच कंपनी प्रतिनिधींनी स्वागत केले. येत्या दोन-तीन दिवसांत आपल्या वेबसाइटवर यासाठी प्लॅटफॉर्म तयार करून देण्याचा आपला प्रयत्न राहिल असे डॉ. कोल्हे यांनी सांगितले.

राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांनी उद्योगांचे अर्थचक्र सुरळीत करण्याला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे “पुनश्च हरी ओम” म्हणत आपल्याला अर्थव्यवस्था रुळावर आणण्याला प्राधान्य देण्याचे सुतोवाच केले आहे. या पार्श्वभूमीवर खासदार डॉ. कोल्हे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीला चांगला प्रतिसाद मिळाला. तसेच आपण सातत्याने एकमेकांच्या संपर्कात राहून तुमच्या अडचणी सोडविण्यासाठी एकत्रित प्रयत्न करू असे आवाहन डॉ. कोल्हे यांनी केले.

Read more...

पिंपरी-चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा मिळणार

पिंपरी-चिंचवडकरांना शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा मिळणार

– आमदार महेश लांडगे यांचा पाठपुरावा

– महापालिकेच्या उत्पन्नात वाढ होण्यासाठी प्रभावी उपाययोजना

सजग वेब टिम, पिंपरी चिंचवड

पिंपरी । कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे सर्वसामान्य नागरिकांची अर्थिक स्थिती विस्कळीत झाली आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाकडून मिळकतकर वसुली करताना शास्तीकर अथवा दंड आकारणी केली जाणार नाही. मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, तशा हालचाली प्रशासनाने सुरू केल्या आहेत, अशी माहिती भाजपाचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी केली आहे.

पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांकडून मिळकतकर वसुली करताना शास्ती अथवा दंड आकारला जावू नये, अशी मागणी आमदार महेश लांडगे यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे केली होती. यावर प्रशासनाचा महसूल वाढावा आणि मिळकतकर वसुली व्हावी. तसेच, कोरोना संकटाच्या काळात नागरिकांना काहीप्रमाणात का असेना दिलासा देण्याचा प्रयत्न प्रशासनाने केले आहे.
याबाबत आमदार महेश लांडगे म्हणाले की, महापालिका हद्दीतील निवासी/ बिगरनिवासी मिळकतधारकांकडून करवसुली केली जाते. सध्या कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव व लॉकडाउन घोषित केल्यामुळे नागरिक व उद्योजकांच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत एप्रिल व मे या दोन महिन्याच्या कालावधीत मिळकतकरापोटी भरणा कमी झाला आहे. मनपा हद्दीतील अनधिकृत बांधकाम करण्याऱ्या मिळकतधारकांना मिळकतकर व शास्तीकर लावलेला आहे. नागरिक मूळ मिळकतकर भरण्यास तयार आहेत. मात्र, करसंकलन कार्यालयाकडून मूळ मिळकतकर व शास्तीकर भरण्यासाठी नागरिकांकडे मागणी केली जात आहे. दोन्ही रक्कम भरण्यासाठी सक्ती करण्यात येत आहे. परिणामी, शहरातील मिळकतधारकांमध्ये नाराजीचा सूर आहे. दुसरीकडे, कोरोना विषाणु प्रादुर्भावामुळे महापालिकेच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. त्यामुळे महापालिकेची आर्थिक स्थिती सावरण्यासाठी मिळकतकर वसुली होण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने मध्यममार्ग काढण्याचा प्रयत्न केला आहे.

शास्तीकर माफीबाबत राज्य सरकारकडे पाठपुरावा कायम…
पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांची शास्तीकरामधून पूर्ण मुक्तता व्हावी, अशी आमची मागणी आहे. त्याबाबत आम्ही राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहे. राज्य शासनाचे पुढील आदेश येईपर्यंत महापालिका प्रशासनाने शास्तीकर आणि दंड वगळून मिळकतकर वसुली करता येईल का? याबाबत महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. त्यानंतर शास्तीकराबाबत राज्य सरकारचा आदेश येईपर्यंत मूळ मिळकतकर भरण्याची सुविधा नागरिकांसाठी उपलब्ध केली आहे. यापुढील काळात पूर्ण शास्तीकरमाफीबाबत आम्ही पाठपुरावा करणार आहे, अशी माहिती आमदार लांडगे यांनी दिली.

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे…
कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनाला कोरोनविरुद्ध उपाययोजना करण्यासाठी मोठ्या प्रमाणात आर्थिक तरतूद करावी लागणार आहे. मिळकतधारकांचीही आर्थिक घडी विस्कळीत झाली आहे. त्यामुळे नागरिकांनी शास्तीकर वगळून मूळ मिळकतकर भरणा करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन आमदार लांडगे यांनी केले आहे.

Read more...

नारायणगावकरांसाठी दिलासादायक बातमी : त्या व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

नारायणगावकरांसाठी दिलासादायक बातमी : त्या व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह

सरपंच योगेश पाटे व डाॅ.वर्षा गुंजाळ यांची माहिती

सजग वेब टिम, जुन्नर

नारायणगाव | नारायणगाव येथील कावळे सोसायटीत मुंबईहुन आलेल्या एका व्यक्तीचा संशयास्पद मृत्यु झाल्याने त्यांच्या घरातील दोन व्यक्तींच्या स्वॅबचे नमुने तपासणीसाठी नेऊन त्यांना लेण्याद्री कोविड केअर सेंटर मध्ये ठेवण्यात अाले होते.

आज सकाळीच “त्या” दोन व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल निगेटिव्ह आला असल्याची महिती लोकनियुक्त सरपंच योगेश पाटे व वैद्यकिय अधिकारी वर्षा गुंजाळ यांनी दिली असून नागरिकांनी घाबरण्याचे कारण नाही परंतु काळजी घ्यावी व नियमांचे पालन करावे असे आवाहन यानिमित्ताने केले आहे.

सदर व्यक्तींचा कोरोना अहवाल निगेटिव्ह अाल्याने नारायणगाव परिसरातील लोकांमधील भीतीचे वातावरण कमी झाले आहे.

Read more...

शेरकर – बोऱ्हाडे वादात आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी

शेरकर – बोऱ्हाडे वादात आमदार अतुल बेनके यांची यशस्वी मध्यस्थी

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | शिरोली बु. येथील शिवऋण प्रतिष्ठानचे अक्षय बोऱ्हाडे व श्री विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील शेरकर यांच्यातील वादावर आज रविवार (दि.३१) रोजी अखेर पडदा पडला आहे.
जुन्नर तालुक्याचे आमदार अतुल बेनके यांनी हा वाद मिटवण्यासाठी महत्त्वाची भूमिका निभावली. आज हा वाद मिटविण्यात बेनके तसेच शिरोली ग्रामस्थांना अखेर यश आले आहे. राष्ट्रवादी युवकचे तालुका अध्यक्ष सुरज वाजगे, युवा सेना प्रमुख गणेश कवडे यांनी देखील यात महत्वाची भूमिका निभावली.

फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून बोऱ्हाडे यांनी व्हायरल केलेल्या व्हिडीओ मुळे संपुर्ण राज्यात या प्रकरणी उलटसुलट चर्चा सुरू झाल्या होत्या. शिवजन्मभूमी जुन्नर विषयी होत असलेल्या चर्चेस पूर्ण विराम मिळावा व गावातील भांडण गावातच मिटले जावे या हेतूने आमदार बेनके यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने दोघांमध्ये चर्चा घडवून आणली.

यावेळी दोघांनी एकमेकांविषयी झालेले समज- गैरसमज दूर करत आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली. दोघांनीही आपआपले सामाजिक काम एकमेकांच्या सहकार्याने एकत्रितपणे करण्याची भूमिका ग्रामस्थांसमोर जाहीर केली.

सध्या तालुक्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि त्यातच या प्रकरणास वेगळे वळण लागून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी हा वाद मिटविण्यासाठी पुढाकार घेतला असल्याचे आमदार बेनके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
बोऱ्हाडे-शेरकर प्रकरणात आपल्या शिवजन्मभूमीची बदनामी होऊ नये हा वाद कुठेतरी थांबावा या उद्देशाने सर्वांनीच प्रयत्न केले . गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, पोलिस पाटील, तंटामुक्ती अध्यक्ष, ग्रामविकास समिती व ग्रामस्थांनी बैठक घेऊन सत्यशील शेरकर व अक्षय बोऱ्हाडे यांना समक्ष घेऊन चर्चेतून हा वाद सामोपचाराने मिटवला.

खासदार डॉ. अमोल कोल्हे, आमदार अतुल बेनके, सूरज वाजगे , गणेश कवडे, जालिंदर शिंदे, प्रदिप कंद, सनी निम्हण यांनी महत्वपूर्ण भूमीका पार पाडली. या प्रकरणी सोशल मीडियावर कोणीही उलटसुलट चर्चा करू नये असे आवाहन आमदार बेनके यांनी केले आहे.

Read more...

आंबेगाव तालुक्यात तब्बल १५ नवे कोरोना रुग्ण, प्रशासनाची उडाली झोप

आंबेगाव तालुक्यात तब्बल १५ नवे कोरोना रुग्ण, प्रशासनाची उडाली झोप

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर (दि.२९)| आंबेगाव तालुक्यातील कोरोना संशयित व्यक्तींचे तपासणी अहवाल आज प्राप्त झाले. या अहवालाने आंबेगाव तालुक्यातील प्रशासनाची झोप उडाली आहे. तालुक्यात १५ रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती पंचायत समितीचे गट विकास अधिकारी जालिंदर पठारे यांनी दिली आहे. या बातमीने आंबेगाव तालुक्यात मोठी खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे आंबेगाव तालुका हा कोव्हिड १९ चा हॉटस्पॉट बनला आहे.

आंबेगाव तालुक्यात यापूर्वी दहा पॉझिटिव्ह रुग्ण आढळले होते. यामध्ये साकोरे १, शिनोली ३, निरगुडसर १, जवळे १ , वडगाव काशिंबे १ ,पिंगळवाडी १, वळती १, गिरवली १ त्यातील शिनोली येथील एक रुग्ण बरा होऊन घरी परतला आहे.

आज आलेल्या अहवालानुसार वडगाव काशिंबे ७ , शिनोली १ , घोडेगाव १, फदालेवाडी ३, एकलहरे १, पेठ २ असे एकूण १५ जण पॉझिटिव्ह सापडले असल्याची माहिती मिळाली आहे. कालच उत्पादनशुल्क तथा कामगार मंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी कोरोना विषयक तालुका आढावा बैठक घेऊन तालुक्यातील रुग्णांचा आढावा घेतला होता. मात्र आज आलेल्या अहवालामुळे आंबेगाव तालुका हा हॉट स्पॉट बनला असल्याचे जाणवत आहे आंबेगाव तालुक्यातील बहुतेक प्रमुख गावे आणि बाजारपेठा बंद आहेत.

Read more...

अक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील

अक्षय बोऱ्हाडेला आमचा जाहीर पाठिंबा – आढळराव पाटील

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | अक्षय बोऱ्हाडे प्रकरणी सोशल मीडियाद्वारे संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र पडसाद उमटले आहेत. या मुद्द्यावर आता राज्यातील राजकारण पेटू लागले आहे. माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, माजी आमदार शरद सोनवणे, जुन्नर तालुका शिवसेनेचे प्रमुख माऊली खंडागळे, मावळ तालुका युवासेना प्रमुख अनिकेत घुले आदींनी आज बोऱ्हाडे यांची त्यांच्या घरी जाऊन भेट घेतली.

या दरम्यान आढळराव पाटील यांनी आपली प्रतिक्रिया सोशल मीडियावर प्रसिद्ध केली आहे. त्यात त्यांनी म्हंटले आहे की “गेले दोन दिवस मी या घटनेची इतंभूत माहिती घेऊन अक्षय बोऱ्हाडे, सत्यशील शेरकर तसेच पोलीस प्रशासनाशी बोलून सर्व माहिती पडताळली. याप्रकरणी अक्षयची समक्ष भेट घेऊन त्याला पाठिंबा द्यावा यासाठी मला अनेकांनी फोन केले.

या संपूर्ण विषयावर मी अक्षयशी सविस्तर चर्चा केली असून व्यक्तिशः माझ्याकडून व शिवसेना पक्षाकडून काही मदत लागल्यास मी खंबीरपणे उभा आहे असे सांगून अक्षयला आश्वस्त केले आहे. निराधार व मनोरुग्ण व्यक्तींची अक्षय करीत असलेली सेवा मी गेली अनेक वर्षांपासून पहात आहे. त्याच्या या कार्याची दखल घेऊनच गेल्या २ वर्षांपूर्वी मी संस्थापक-अध्यक्ष असलेल्या श्री भैरवनाथ नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वार्षिक सभेत ‘श्री भैरवनाथ जीवन गौरव पुरस्काराने’ अक्षयला सन्मानित केले. यापूर्वीदेखील ज्या ज्या वेळी अक्षयला गरज पडली त्या त्या वेळी मी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून सहकार्य करायला सांगितले हे अक्षयलाही चांगलेच माहित आहे.

परवा झालेल्या प्रकरणाबद्दल शिवसेना पक्षाचा उपनेता व संपर्कप्रमुख म्हणून शिवसेना पक्षाच्या वतीने सामाजिक कार्यकर्ता अक्षय बोऱ्हाडे यास पाठिंबा जाहीर करत आहे.”

या दरम्यान सत्यशील शेरकर यांच्यावर काल जुन्नर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेश विद्यमान खासदार अमोल कोल्हे यांनी काल दिले असल्याचे सांगितले आहे. आता या प्रकरणात शिरूर लोकसभा क्षेत्रातील शिवसेनेने उघड भूमिका घेतल्याने या प्रकरणाने आता राजकिय वळण घेतले आहे.

Read more...

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

औंध-रावेत उड्डाणपुलाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण

सजग वेब टिम, पुणे

पुणे | औंध-रावेत रस्त्यावरील साई चौक येथील दोन समांतर उड्डाणपुलांंपैकी औंध-रावेत या उड्डाणपुलाचे आज उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

या उड्डाणपुलामुळे पुणेकरांची अनेक वर्षांची मागणी पूर्ण झाली असून या पुलामुळे साई चौकामधील वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटून नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.

या उड्डाणपुलाच्या लोकार्पण कार्यक्रमाप्रसंगी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद यादव यांच्यासह महानगरपालिका प्रशासनातील वरीष्ठ अधिकारी उपस्थित होते.

Read more...

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर ; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू

जुन्नर तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या १९ वर
; औरंगपूर येथील एकाचा मृत्यू

सजग वेब टिम, जुन्नर

जुन्नर | जुन्नर तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वेगाने वाढताना दिसत आहे. आज औरंगपूर याठिकाणी मुंबईहून आलेल्या एका कोरोना पॉझिटिव्ह व्यक्तीचा पहाटे मृत्यू झाला असून या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींपैकी ३ जणांना विलगिकरण कक्षात ठेवण्यात आले असून एका व्यक्तीला पुणे याठिकाणी पाठविण्यात आले आहे.

आज सकाळी विठ्ठलवाडी (वडज) याठिकाणी राहणाऱ्या एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला असून जुन्नर तालुक्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या आता १९ झाली आहे. तालुक्यातील ऍक्टिव्ह केसेसची संख्या १७ झाली आहेत.

रुग्णसंख्या आणि गावे खालील प्रमाणे

सावरगाव ६, धोलवड ३, मांजरवाडी २, पारुंडे  २, आंबेगव्हाण २, धालेवाडी तर्फे मिन्हेर १, औंरगपूर १, विठ्ठलवाडी वडज -१ तर डिंगोरे येथील १ व्यक्ती बरी झाली आहे.

तालुक्यातील वाढती रुग्णसंख्या पाहून जुन्नरकरांची चिंता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

या सर्व परिस्थितीत प्रशासनाने तालुका रेडझोन म्हणून जाहीर करून कठोर पावले उचलण्यात यावीत अशी मागणी काही नागरिक करत आहेत.

Read more...
Open chat
Powered by