सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या निष्क्रियतेमुळे पाच महिन्यापासून लोककलावंत मानधनापासून वंचित

खंडूराज गायकवाड , मंत्रालय प्रतिनिधी
मुंबई | राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या  निष्क्रियतेमुळे फेब्रुवारीच्या  विधिमंडळ अधिवेशनात  आर्थिक तरतूद न केल्याने सुमारे तीस हजार वयोवृद्ध  लोककलावंतांना पाच महिन्यांचे मानधन मिळाले नाही.

ही चूक उशिरा लक्षात आल्याने संबंधितांनी अखेर सध्याच्या जूनच्या अधिवेशनात ४५ कोटी रुपयांची आर्थिक तरतूद करून घेतली.

आज महाराष्ट्रातील हजारो  वयोवृद्ध लोककलावंताकडे एक वेळचे जेवायला ही पैसे नाहीत.काही कलावंत अपुऱ्या औषधोपचारमुळे  मृत्युमुखी पडलेच्या घटना घडल्या आहेत.यातच सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या अशा भोंगळ कारभारामुळे राज्यातील सुमारे तीस हजार वयोवृद्ध लोककलावंतांना फेब्रुवारी पासून  ते आज जून महिना संपत आला तरी मानधन मिळाले नाही.

लोकसभा निवडणुकीपूर्वी  लेखानुदान सादर करणारे विधिमंडळाचे अधिवेशन पार पडले.या अधिवेशनात नियमित योजनांवर सर्व खात्यांनी आर्थिक तरतूद करून घेतली होती. मात्र सांस्कृतिक कार्य संचालनालयाने त्या काळात आपल्या खात्याकडे वयोवृद्ध लोककलावंताच्या मानधनासाठी अधिकृत प्रस्तावच सादर न केल्याने मोठी गडबड झाली.हे संचालनालयाच्या उशिरा लक्षात आले. मात्र यामुळेपाच महिन्यापासून गरीब गरजू लोककलावंत मानधनापासून वंचित राहिला.

सध्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे अनेक।वरिष्ठ अधिकारी “कार्यालयात कमी,आणि दौरे नेहमी” या प्रकारे काम करीत असल्याने अनेक योजना मध्ये अशाच अडचणी निर्माण झाल्याचे कळते.

चालू अधिवेशनात ४५कोटी रुपयांची तरतूद या मानधनासाठी करण्यात आली असून आता हे।मानधन साधारणपणे जुलै अखेर पर्यत मिळण्याची शक्यता आहे.

Read more...

‘ट्राफिक ट्राफिक’ अल्बमच्या पोस्टर चे शिर्डी येथे अनावरण

‘ट्राफिक ट्राफिक’ अल्बमच्या पोस्टर चे शिर्डी येथे अनावरण

सजग वेब टीम

नारायणगाव | ट्रॅफिक विषयावर जनजागृती करणाऱ्या साईप्रेम रिदम हाऊस प्रस्तुत ‘ट्राफिक ट्राफिक’ या गाण्यांच्या अल्बमच्या पोस्टर चे शिर्डी येथे अनावरण आज शिर्डी येथे करण्यात आले.
श्री साईबाबा देवस्थान संस्थानचे उपाध्यक्ष चंद्रशेखर लक्ष्मणराव कदम यांच्या हस्ते या अल्बमच्या (गाण्याच्या)पोस्टरचे अनावरण करण्यात आले.

या अल्बमसाठी निर्माता, गीतकार आणि गायक- वैभव मुथ्था, दिग्दर्शक- आकाश डावखरे, सह निर्माता – सचिन ठाकूर, संजय थोरवे, संगीतकार – शेखर साळवी, छायांकन – सौरभ पवार, नृत्य – विशाल अमोलिक, सह-दिग्दर्शक – प्रज्वल मेहेर, सी के खेडकर, सहा. छायांकन – प्रथमेश शेवाळे, एरियल सिनेमॅटोग्राफी – रोहित ढमाले, नवीन भुजबळ यांनी काम पाहिले.

मिडिया पार्टनर म्हणून सजग टाईम्स न्यूज, समाज दर्पण , आय वन न्यूज या माध्यमांनी सहकार्य केले.

यावेळी वैभव मुथ्था, आकाश डावखरे, सचिन ठाकूर, मुकेश वाजगे शिर्डी संस्थान चे इतर पदाधिकारी आणि विश्वस्त आदी उपस्थित होते.

Read more...

नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव उत्साहात साजरा, जि. प. शाळांचा उत्स्फूर्त सहभाग

नारायणगाव | ग्रामपंचायत नारायणगाव यांच्या वतीने परिसरातील सर्व जि.प.प्राथमिक शाळांचा संयुक्त “नारायणगाव सांस्कृतिक महोत्सव-२०१९” पूर्व वेस,नारायणगाव येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.एकूण नऊ जि.प.शाळांनी या महोत्सवात सहभाग घेतला. या महोत्सवामाध्येच नारायणगाव परिसरातील उस उत्पादक शेतकऱ्यांसाठी स्व.साबीरभाई शेख ठिबक सिंचन अनुदान वाटपाचे लकी ड्रो कार्यक्रम घेण्यात आल्याची माहिती सरपंच श्री.योगेश बाबु पाटे व उपसरपंच संतोष दांगट यांनी दिली.


महोत्सवाचे उद्घाटन जुन्नर पंचायत सामितीचे गटविकास अधिकारी श्री.विकास दांगट आणि सहाय्यक निबंधक यशवंती मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आले या प्रसंगी विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे संचालक संतोषनाना खैरे,गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे,पंचायत समिती सदस्या अर्चना माळवदकर,बाळासाहेब पाटे,एकनाथ शेटे,सुजित खैरे,आशिष माळवदकर,डॉ.संदीप डोळे,शिवसेना शहर प्रमुख अनिल खैरे,उपसरपंच संतोष दांगट, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ,शिक्षक,पालक,विद्यार्थी मोठ्या संख्येने हजर होते.

‘चौदाव्या वित्त आयोगातून प्राथमिक शाळांच्या उन्नती,विकास कार्यक्रमासाठी ग्रामपंचायतीने केलेल्या सर्व वित्तीय आराखड्यास पंचायत समिती जुन्नर कार्यालयाकडून परवानगी दिली जाईल तेसच ठिबक सिंचन योजनेला ग्रामपंचायत अनुदान इतकेच अनुदान पंचायत समिती जुन्नर मार्फत देण्यात येईल असे मनोगत गटविकास अधिकारी विकास दांगट यांनी व्यक्त केले.
पंचायत समिती जुन्नरचे गटशिक्षण अधिकारी पी.एस.मेमाणे यांनी ग्रामपंचायतीने आयोजित केलेल्या महोत्सवामुळे जि.प.प्राथमिक शाळांना सांस्कृतिक महोत्सवामुळे जि.प.प्राथमिक शाळांना सांस्कृतिक मंच उपलब्ध झाला असून शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठी शासन व समाज यांनी एकत्रित प्रयत्न करावेत असे सांगितले.

सरपंच योगेश पाटे यांनी परिसरातील सर्व जि.प.प्राथमिक शाळांचा विकास आराखडा पंचायत समिती जुन्नर सर्व अधिकारी,शिक्षक आणि समाजातील शिक्षण प्रेमी व्यक्तींच्या मार्गदर्शनाने तयार करून गुणवत्ता पूर्ण शैक्षणिक वातावरण ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून करण्यात येईल असे सांगितले.
या प्रसंगी यशवंती मेश्राम,संतोषनाना खैरे,यांचेही भाषण झाले.

सर्व सहभागी शाळा विद्यार्थीनी ग्रामपंचायतच्या वतीने स्मृतीचिन्ह, प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले तसेच तसेच मान्यवरांच्या हस्ते साबीरभाई शेख ठिबक सिंचन योजने अंतर्गत जाहीर झालेला उस उत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
महोत्सवाकामी विशेष परिश्रम घेणाऱ्या सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांचा सन्मान सरपंच योगेश पाटे व उपसरपंच संतोष दांगट यांनी केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महादेव खैरे यांनी केले तर उपस्थितांचे आभार ज्ञानेश्वर औटी यांनी मानले.

Read more...

बाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके

बाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके

सजग वेब टीम – बाबाजी पवळे, राजगुरूनगर

राजगुरूनगर-महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात एक अग्रगण्य नाव असलेले बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी तब्बल ४५ वर्ष मराठी संगीतसृष्ठी गाजवताना त्यांच्या सुरांनी शब्दांना सजवले. उत्तम गायक, संगीत दिग्दर्शक, भावगीत गायक, शास्त्रीय सुगम संगीतकार  अशी त्यांची विविध रूपे महाराष्ट्राने अनुभवली. ते खऱ्या अर्थांने मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ होते अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केली ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटीलस्मृती  व्याख्यानमालेत  बाबूजींची गाणी जीवनाची गाणी या विषयावर बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर,  डॉ.रोहिणी राक्षे, अॅड. माणिक पाटोळे,  अंकुश कोळेकर,  उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील,  व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला  बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गायक श्रीधर फडके यांचे स्वागत अॅड. राजमाला  बुट्टेपाटील यांनी केले.

श्रीधर फडके यांनी बोलताना सांगितले की संगीत क्षेत्रात बाबूजींचे नाव जोडले गेले ते गीतरामायण या त्यांनी गायिलेल्या संगीतरामकथेशी. ग.दि.माडगूळकर त्यांनी शब्धबद्ध केलेले व बाबूजींनी गायिलेल्या गीतरामायणाने मराठी मनावर आजही गारुड केले आहे. ते पुढे म्हणाले की, सुधीर फडके ज्या पद्धतीने जगले त्याचा स्पर्श त्यांच्या गाण्याला झाला आहे. उदात्त, उत्कट मूल्यांची कास धरून आणि सत्यतेची साथ न सोडता ते जगले असे सांगून त्यांच्या गाण्यात दरवळणारा सुगंध हे त्याचेच प्रतीक असल्याचे ते म्हणाले. बाबूजींनी गाण्याची चाल आकर्षक, गोड व प्रासादिक असावी यासाठी विशेष लक्ष दिले. प्रखर देशभक्तीच्या भूमिकेतूनही त्यांनी  दादरा नगरहवेली या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भारतातील प्रदेशाची मुक्तता करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी बाबूजींची  झाला महार पंढरीनाथ, जय शारदे, तोच चंद्रमा नभात, धुंदी कळ्यांना, सखी मंद झाल्या तारका, वंद्य वंदे मातरम, ज्योती कलश झलके, पराधीन आहे पूत्र मानवाचा, बलसागर भारत होवो, जाळीमंदी पिकली करवंद, बाई मी पतंग उडवीत होते अशी एकापेक्षा एक सरस आणि सुप्रसिद्ध गाणी सादर करून बाबूजींच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला.  तसेच त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली फिटे अंधाराचे जाळे, देवाचिया द्वारी, ओंकार स्वरूपा अशी अनेक गाणीही सादर केली. तसेच त्या गाण्यांंमागची कथासुद्धा उलगडून सांगितली. त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, बाबूजींच्या आठवणी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर व तबलजी तुषार आंग्रे यांनी साथ दिली. त्यांची मुलाखत प्रा. शिल्पा टाकळकर यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बापूसाहेब चौधरी यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. राजेंद्र शिरसी यांनी तर आभार कु. कावेरी भोर हिने मानले.

Read more...

माध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर

माध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर

सजग वेब टीम

पुणे | ”माध्यम शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे,भाषेची आणि अभिव्यक्तीची जी कौशल्ये आपण शाळेपासून शिकवतो त्या भाषेचा संवादासाठी कसा वापर करावा हे आता ज्या माध्यमातून करायचा आहे,ते आताचे माध्यम सोशल मीडिया आहे. तिथे याचा कसा वापर करावा हे शिकवले गेले तरच यांचा योग्य उपयोग होईल “असे पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर म्हणाले. एस .एस . प्रॉफेशनल्स कॅम्पस आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस् महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोशल मीडिया वरील कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
सोशल मीडियासाठी दृक् श्राव्य माध्यमातून प्रकट होताना वैचारिक कल्पना विस्तार कसा असावा,याविषयी माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षक अभिजीत टिळक यांनी प्रशिक्षणार्थीना दृक् श्राव्य कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेची संकल्पना व नियोजन एनयुजे महाराष्ट्रच्या प्रवक्त्या शिल्पा देशपांडे यांचे होते.
एस.एस. प्रॉफेशनल्स चे संचालक डॉ. शिशिर पुराणिक यांनी भविष्यात अशा अजून कार्यशाळा आयोजित करणार आहोत, ज्या द्वारे सोशल मीडिया चा योग्य वापर होईल ,असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन शिशिर पुराणिक यांनी केले.
या कार्यशाळेसाठी सुमारे ३० प्रशिक्षणार्थीना आपला सहभाग नोंदविला यामध्ये पत्रकार ,उद्योजक ,विद्यार्थी तसेच कलाकार यांचा समावेश होता.नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषांत सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकाराने झाल्यास पत्रकारिताही चांगल्या दिशेने जाईल असे सांगितले .
दुसऱ्या सत्रामध्ये आजची शिक्षणपद्धती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यामध्ये डॉ. शिशिर पुराणिक ,अर्चना मवाळ ,शीतल करदेकर यांनी सहभाग घेतला तर पत्रकारितेतील आव्हाने या विषयावरील परिसंवादात सचिन चपळगावकर ,रायचंद शिंदे ,जितेंद्र जाधव ,श्रीकांत काकतिकर ,यांनी विचारमंथन केले . या कार्याक्रमामध्ये श्रीकांत काकतीकर यांचा बेळगाव जिल्ह्यातील युनियन च्या कार्याबद्दल विशेष सत्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यशाळा उपक्रमासाठी दीपक चव्हाण ,युनियन च्या खजिनदार वैशाली आहेर,सुषमा पाटील यांनी विशेष योगदान दिले या कार्यक्रमासाठी विजया मानमोडे ,तुषार शेंडे ,आदी पुणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

Read more...

चित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम ; ‘प्रेमरंग’ चित्रपटात शरद गोरे यांची ऐतिहासिक कामगिरी

चित्रपट क्षेत्रात तब्बल नऊ जबाबदाऱ्यांचा विक्रम ;
‘प्रेमरंग’ चित्रपटात शरद गोरे यांची ऐतिहासिक कामगिरी

सजग वेब टिम

मनोरंजनातून प्रबोधनाची कास धरणाऱ्या शरद गोरे यांनी लवकरच प्रदर्शित होत असलेल्या ‘प्रेमरंग’ या चित्रपटात निर्माता, दिग्दर्शक, कथा, पटकथा, गीत, संवाद लेखन, संगीत, नृत्य दिग्दर्शन आणि अभिनय अशी चौफेर कामगिरी बजावली आहे. एकाच चित्रपटात तब्बल नऊ जबाबदाऱ्या पार पाडणे हा मराठी चित्रपटसृष्टीतील विक्रमच म्हणावा लागेल.

मूळचे साहित्यिक असणारे गोरे यांचा कलेच्या माध्यमातून मनोरंजनाद्वारे प्रबोधन करण्यावर दृढ विश्वास आहे. आगामी ‘प्रेमरंग’ हा त्यांचा रूढार्थाने रोमँटिक चित्रपट असला तरीही ‘प्रेम ही त्यागाची भावना आहे. भोगाची नाही, असा संदेश ते तरुणाईला या चित्रपटातून देऊ इच्छितात. कोकणाची पार्श्वभूमी असलेल्या या चित्रपटात फणसासारखी वरून खडबडीत, मात्र आतून मधूर, अशी अस्सल मालवणी व्यक्तिरेखा आणि तिचे संवाद हे या चित्रपटाचे एक वैशिष्ट्य आणि आकर्षण ठरणार आहे. या चित्रपटामध्ये विविध रसांची अनुभूती देणाऱ्या सहा गाण्यांचा समावेश आहे. त्यामध्ये शास्त्रीय, उपशास्त्रीयपासून ‘आयटम सॉंग’पर्यंत सर्व प्रकारांचे वैविध्य प्रेक्षकांना अनुभवता येईल. या चित्रपटातील गाण्यांमध्ये ‘काव्या’ला महत्व देण्यात आले असून कथेला पुढे नेतानाच एखाद्या स्वतंत्र व्यक्तिरेखेइतका प्रभाव ही गाणी निर्माण करतात. चित्रपटाचे लेखक, दिग्दर्शक स्वतः कवी असल्याने कथेत कवितेला महत्व स्वाभाविक आहे. डिजिटल क्रांतीनंतर चित्रपट निर्मितीच्या तंत्रातही आमूलाग्र बदल घडून आले आहेत. ‘प्रेमरंग’च्या निर्मितीतही उच्च तंत्रज्ञानाचा वापर केल्याने आशयाने समृद्ध असलेला हा चित्रपट नेत्रसुखदही ठरणार आहे.

निर्माता म्हणून गोरे यांचा हा पहिला चित्रपट असला तरी त्यांनी यापूर्वी रणांगण, उष:काल या चित्रपटासह सत्यांकुर, अन्नदान की पिंडदान, महापूजेची उत्तरपूजा, पंखातलं आकाश या लघुपटांचे दिग्दर्शन केले आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या नाटकासह अनेक चित्रपट, लघुपटांसाठी गीत, संगीत, दिग्दर्शन त्यांनी केले आहे. पंखातलं आकाश या त्यांच्या पहिल्याच लघुपटाचे खुद्द शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीही कौतुक केले होते. उषा मंगेशकर, रवींद्र साठे अशा अनेक दिग्गजांनी त्यांच्या संगीत असलेल्या गाण्यांना स्वरसाज चढविला आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जाज्ज्वल्य इतिहास नव्या पिढीसमोर वास्तवस्वरूपात आणण्यासाठी थ्री डी माध्यमाचा वापर करून भव्य चित्रपटाची निर्मिती करण्याचे गोरे यांचे स्वप्न आहे.

Read more...

भिमाशंकर करंडक युवा महोत्सव २०१९ ची दिमाखदार सुरुवात


मंचर | आज बुधवार दिनांक १६ जानेवारी भीमाशंकर करंडक युवा महोत्सव २०१९ चे उद्घाटन पुणे जिल्हा परिषद सदस्या सौ.अरुणा काकी थोरात यांच्या शुभहस्ते हस्ते करण्यात आले.

या वेळी शरद सहकारी बँकेचे संचालक दत्ताशेठ थोरात,खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष रमेशजी खिल्लारी,पंचायत समिती सदस्य संजय गवारी,भीमाशंकरचे माजी संचालक संजयशेठ बाणखेले थोरात,राजबाबू थोरात,ग्रामपंचायत सदस्य बाजीराव मोरडे,सौ कविताताई थोरात,प्रविनजी मोरडे,वेणूताई खरमाळे,कुमारी मयुरी(किट्टू)थोरात आदी मान्यवर उपस्थितीत होते तसेच कार्यक्रमाचे प्रास्ताविक अँड निलेशजी शेळके यांनी केले तर आभार मंचर ग्रामपंचायत सदस्य लक्ष्मणभाऊ थोरात यांनी मानले.

Read more...

श्रीशंभुराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर काढलेली आकर्षक रांगोळी

मुंबई | १६ जानेवारी २०१९ रोजी छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेकदिनाचे अौचित्य साधून शंभुभक्त प्रसाद मुंढे (रा. मस्जिद बंदर) यांनी स्वराज्यरक्षक संभाजी मालिकेच्या सेटवर आकर्षक रांगोळी काढली. हि रांगोळी १५ फुट बाय २० फूट असून सकाळी ८.०० ते सायं. ५.०० असा तब्बल ९ तास इतका वेळ रांगोळी काढण्यास लागला.

Read more...

मनमर्जीया

ही कथा रुमी, विकी आणि रॉबी या व्यक्तिरेखांच्या भोवती फिरते, हा एक आगळा-वेगळा प्रेमाचा त्रिकोण आहे. रुमी आणि विकी यांचे एकमेकावर प्रेम असते, विकी हा रुमी शिवाय राहू शकत नाही. विकी हा गायक असून रुमी हि हॉकीपटू असून ती आता एका दुकानात कामाला आहे, एक दिवस रुमी आणि विकी यांना एका खोलीत त्यांचे प्रेम रंगात आलेले असताना त्यांना घरचे लोक रंगे हाथ पकडतात, आणि रुमी चे लग्न लाऊन देण्याचा निर्णय घेतात, विकी वर तिचे प्रेम असते ती त्याला आई-वडिलांना घेऊन ये आणि लग्नाचे ठरवून टाक असे सांगते नाहीतर माझे लग्न दुसऱ्या व्यक्तीबरोबर होईल असे सांगून टाकते पण विकी काही येत नाही त्यामुळे रुमी चे लग्न रॉबी बरोबर होते. पण रूमीच्या मनातून विकी काही जात नाही. त्यामुळे पुढे नेमके काय घडते त्यासाठी सिनेमा पहायला लागेल.

Read more...