खासदार डॉ.अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद

खासदार डॉ .अमोल कोल्हे आयोजित कर्णबधिर शिबिरास सणसवाडीमध्ये ज्येष्ठ नागरीकांचा मोठा प्रतिसाद

 

सजग वेब टीम, सणसवाडी शिरुर

शिरुर । खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विशेष प्रयत्नातून यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई, जगदंब प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आणि स्टार्की फाऊंडेशन अमेरिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या मोफत कर्णबधिर तपासणी व डिजिटल श्रवणयंत्र वाटप शिबिर मालिकेतील दुसरे शिबिर आज हडपसर येथे संपन्न झाले. जि.प सदस्या सौ.सुजाता पवार यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन पार पडले.

                शिरूर लोकसभा मतदारसंघातील ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या वर्षात एक अभिनव उपक्रम राबविण्याच्या प्रयत्नांचा भाग म्हणून खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी शिरुर-हवेली विधानसभा मतदारसंघाचे आमदार आमदार अशोक पवार यांच्या सहकार्याने ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांची मोफत श्रवणदोष तपासणी करण्यात आली. सकाळी ९ ते दुपारी ३ या वेळेत शिबिरात सहभागी झालेल्या सुमारे ३०१ ज्येष्ठ नागरिकांची कानांची तपासणी करण्यात आली. अमेरिकेतील स्टार्की फाऊंडेशनच्या तज्ज्ञ डॉक्टरांनी प्रत्येक नागरिकाची तपासणी केल्यानंतर श्रवणदोष आढळलेल्या व्यक्तींच्या कानाचे मोजमाप घेण्यात आले. शिबिरात पात्र ठरलेल्या व्यक्तींना डिजिटल श्रवणयंत्र मोफत देण्यात येणार आहे.

या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी सभापती मोनिकाताई हरगुडे, रविबापू काळे, पंडित दरेकर, आदी उपस्थित होते. तसेच स्टार्की फाऊंडेशन अमेरिका या संस्थेच्यावतीने डॉ.रवी गुप्ता, डॉ.सागर कानेकर, डॉ.पी.व्ही सरथ, डॉ.निहार प्रधान, डॉ.यशवंत सिंह, डॉ.सुरजित पेन, डॉ.स्टेजीन बेनी आदींनी कर्णबधिर ज्येष्ठ नागरिकांची तपासणी केली. शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी, ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, आशा वर्कर,आदी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

Read more...

संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ही महाआरती पोहोचणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात

महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी बनविलेली छत्रपती शिवरायांची पहिली भव्य दिव्य आरती लवकरच होणार प्रसिद्ध
संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे तिथे तिथे ही महाआरती पोहोचणार – वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात
सजग वेब टीम पुणे 
पुणे । क्षितिज प्रोडक्शन, पुणे” निर्मित गीतकार विश्वासराजे थोरात यांनी लिहिलेल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत छ.शिवाजी महाराजांच्या भव्य दिव्य महाआरतीचे व्हिडिओ चित्रीकरण नुकतेच पुणे येथे चतुःशृंगी मंदिराच्या प्रांगणात मोठ्या दिमाखात पार पडले असून लवकरच ही आरती प्रसिद्ध होणार आहे.या चित्रीकरणाचे उद्घाटन चतुःशृंगी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे,सांगली जि.प.माजी अध्यक्ष आनंद डावरे यांचे हस्ते चतुःशृंगी देवी व महाराजांच्या पुतळ्यास श्रीफळ वाढवून करण्यात आले.या प्रसंगी त्यांनी विश्वासराजे थोरात यांचे काव्य लेखनाचे कौतुक करून आरतीच्या उपक्रमात सहभागी असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी आपल्या भावना व्यक्त करताना या महा आरतीचे गीतकार,वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वासराजे थोरात यांनी संपूर्ण जगात जिथे जिथे मराठी माणूस आहे,तिथपर्यंत शिवरायांची ही महाआरती पोहचेल,असे नमूद करून या आरती बरोबरच आपण लिहिलेले “गणरायाला साकडे” हे गीत आणि ज्ञानेश्वर माऊलींवरील पालखी सोहळा अभंग ही आगामी गीतेही “क्षितिज प्रोडक्शन” ला निर्मितीसाठी विना मोबदला दिली असल्याचे जाहीर केले.त्यांनी यावेळी तिन्ही गीतांचे लेखनाचे रोमहर्षक प्रसंग सांगताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.
यावेळी “क्षितिज प्रोडक्शन” च्या वतीने निर्माती सौ.कल्पना विश्वासराजे थोरात यांचे हस्ते मान्यवरांचे सत्कार करण्यात आले. त्या म्हणाल्या की, “माझे पती यांनी त्यांच्या तिन्ही गीतांचे निर्मितीचे कायदेशीर सर्वाधिकार मला दिले असून शिवरायांची पहिली भव्य दिव्य आरती मी भैरवनाथ पतसंस्थेचे कर्ज काढून शिवरायांच्या चरणी अर्पण करीत आहे”या आरती साठी महाराष्ट्र पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी यांनी विना मोबदला अहोरात्र कष्ट घेतले आहेत. आरतीचे गायन महिला पोलिस पूजा पारखी जाधव, मुंबई, पो.शि.सागर घोरपडे, (पुणे शहर,) पो.ना.संघपाल तायडे,जळगाव यांनी केले असून उद्घोषणा सहा. पो.निरी.प्रवीण फणसे,मुंबई यांनी केली आहे. तुतारी वादन हनुमान नेटके, पेठ, मंचर यांनी केले आहे. आरतीची सुरुवात “क्षितिज प्रोडक्शन” चे क्षितिज थोरात यांनी शंख वाजवून केली.

या महाआरतीचे व्हिडिओ चित्रीकरणा मध्ये पोलीस निरीक्षक भास्कर जाधव, पुणे शहर, महिला पोलिस उपनिरीक्षक पल्लवी जाधव, जालना, पो.शि.सागर घोरपडे, पुणे शहर, तसेच गीतकार विश्वासराजे थोरात, यांनी अभिनय केला आहे.उद्घोषणा प्रसिद्ध अभिनेते अमोल मोरे यांनी केली आहे.
 या महा आरतीचे संगीत दिग्दर्शक पंचम स्टुडिओचे श्री. अद्वैत पटवर्धन हे असून व्हिडिओ दिग्दर्शक सुनिल वाईकर आणि जितेंद्र वाईकर हे आहेत.ही महाआरती बनविण्यासाठी महाराष्ट्र पोलीस दलातील वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहन जाधव, पुणे,पो. शि.संदिप सूर्यवंशी,पुणे शहर,पो.शि.योगेश गायिके, जालना, पो. ना.राजेश राजगुरे, बुलढाणा, पो.शि.दत्तात्रय गुंजभरे, पो.शि.सोपान निगल, महिला पो.शि.स्नेहलता ढवळे, तसेच प्रसिद्ध उदयोन्मुख गायक संतोष लगड, यांनी मोलाचे योगदान दिले आहे.
याशिवाय आरती मध्ये प्रसिद्ध अभिनेत्री सौ.श्वेता कामत, सौ. पल्लवी अनिरुद्ध पाटील, ओंकार विनायक थोरात, क्षितिज थोरात, निर्माती सौ.कल्पना थोरात,श्री. धनंजय कांबळे, ॲड.प्रताप मुळीक,आगतराव पवार,बाल कलाकार सोहम कैलास औटी, अथर्व मुळीक यांनी अभिनय केला आहे.आरती शूटिंगचे प्रोडक्शन मॅनेजर नितीन जाधव हे असून कॅमेरामन जितू आचरेकर, मुंबई, छायाचित्रकार अविनाश माने, नृत्य दिग्दर्शक किशोर दळवी,केशभूषा निता नागवंशी,वेशभूषा संतोष जगताप तर रंगभूषा नवीन यांनी केली आहे.अक्यूरेट सेक्युरिटीचे  विजय वारुळकर,पिडीसी बँकेचे मोहन पवार,हरिभाऊ औटी, नारायणगाव,माजी सैनिक अशोक पाटील, सिंहगड इन्स्टिट्यूटचे बशीर काझी व चेतन गेगजे,शितल रेणूसे, सकपाळ मॅडम,हरीश हळदे, गोखलेनगर यांनी आपला सहभाग नोंदविला. या महान व अजरामर आरतीसाठी श्री.चतुःशृंगी मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष देवेंद्र अनगळ यांनी जागा उपलब्ध करून दिली. देशातील सर्वात मोठे ढोल ताशा पथक शिवगर्जना प्रतिष्ठान, (अध्यक्ष अजुभाऊ साळुंके) पुणे यांनी त्यांची अदाकारी पेश केली. तर वाघजई मित्रमंडळ, पुणेचे अध्यक्ष निलेश पवार यांनी त्यांचेकडील छ. शिवरायांचा सगळ्यात मोठा पुतळा उपलब्ध करून दिला.चतुःशृंगी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पो.निरी.अनिल शेवाळे यांनी सहकार्य केले.
Read more...

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

कर्जत-भीमाशंकर राष्ट्रीय महामार्गास केंद्राचा हिरवा कंदिल : खा.डॉ.अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१९ | संसदीय हिवाळी अधिवेशनात शिरूर लोकसभेचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी केंद्रीय भ्रूपुष्ट मंत्री मा.नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन तीर्थक्षेत्र भीमाशंकरच्या सर्वांगीण विकासासाठी भीमाशंकरला जाणारा मार्ग हा राष्ट्रीय दर्जाचा व्हावा असे निवेदन दिले होते.
तीर्थक्षेत्र भीमाशंकर हे भाविकांचे श्रद्धास्थान असून या ठिकाणी येण्यासाठी माहामार्गची नितांत आवश्यकता आहे , राष्ट्रीय महामार्ग घोषित झाल्यामुळे या ठिकाणीच्या पर्यटनास निश्चितच चालना मिळेल , पर्यटनवृद्धीमुळे या भागातील रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील. सोबतच मुंबईला जाण्यासाठी वेळेची बचत होईल, या राज्यमार्गाला राष्ट्रीय महामार्गचा दर्जा मिळवा अशी मागणी केली होती.
खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केलेल्या मागणीला केंद्रिय मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे कर्जत-भीमाशंकर मार्ग हा राष्ट्रीय महामार्ग म्हणुन घोषित करण्यासाठी व तसेच या संबधी राज्यमार्ग मंत्रालय सचिव यांना कळविले आहे , महामार्गाच्या मजबुतीकरणासाठी लवकरच कार्यवाही करण्यात येईल असे लेखी पत्र डॉ कोल्हे यांच्या कार्यालयास प्राप्त झाले आहे.

Read more...

पुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे

पुणे- नाशिक महामार्ग बायपाससाठी एकूण २१६ कोटी रुपये मंजूर : खा.डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१८| शिरूर लोकसभा मतदारसंघातील विकास कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी या विभागाचे खा.डॉ.अमोल कोल्हे प्रयत्नशील आहेत असं दिसतं आहे. कोल्हे यांनी आपल्या पहिल्याच अधिवेशनात आपल्या भाषणात लोकसभा मतदारसंघातील वाहतूक कोंडीच्या समस्येवर आवाज उठवला होता, त्यानंतर पुन्हा हिवाळी अधिवेशनात तोच प्रश्न उपस्थित केला. भृपुष्टमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन पुणे -नाशिक महामार्गावरील वाहतूक कोंडी संदर्भात लेखी निवेदनही त्यांनी दिले होते. याचेच फलित म्हणून खेड-सिन्नर महामार्गात सर्वात जास्त वाहतूक कोंडी होणाऱ्या खेड बायपास , मंचर-एकलहरे,पेठ याठिकाणी बायपास करण्यासाठी २१६ कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू झाली आहे.
यामध्ये एकूण १४.१३७ किमी
प्रस्तावित खेड बायपास (किमी ४२ ते किमी ४६.९८) , पेठ (किमी ५६.१००ते ५६७८०)मंचर-एकलहरे बायपास (किमी ६०.१०० ते ६८.५७६) साठी निविदा प्रक्रिया सुरू झाली असून लवकरच पुणे-नाशिक महामार्ग लवकरच वाहतुक कोंडीपासून मुक्त होईल असा विश्वास खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.
सदर बायपास हा ४ पदरी असेल यातील फेज-१ साठी खेड-सिन्नर महामार्ग पूर्ण करण्यासाठी २ वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होईल , लवकरात लवकर निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यासाठीच्या सूचना राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

Read more...

शिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा.डॉ अमोल कोल्हे

शिरुर लोकसभेच्या विकासासाठी लवकरच मेट्रो लोणी काळभोर पर्यंत : खा. डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि.१७ | स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना राज्याचे उपमुख्यमंत्री ना अजितदादा पवार , खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.
शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामांचा याठिकाणी आढावा घेण्यात आला.

स्वारगेट ते हडपसर येथील हडपसर ऐवजी लोणीकाळभोर पर्यंत मेट्रो मार्ग वाढविण्याचा निर्णय शुक्रवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. जुना आराखडा हा स्वारगेट ते हडपसर होता तो बदलून पुढील अहवाल सादर करण्याचा सूचना खासदार डॉ अमोल कोल्हे यांनी ‘पीएमारडीए’ च्या अधिकाऱ्यांना केल्या.
ना अजितदादा पवार ,डॉ कोल्हे यांनी शुक्रवारी पुणे येथे ‘पीएमआरडीएच्या’ च्या सर्व प्रकल्पांची आढावा बैठक घेतली, लोकसभा मतदारसंघात चालू असलेली विविधविकास कामे , नव्याने सुरू करावयाची कामे याचा आढावा घेण्यात आला.

हडपसर भागात होणारे ट्राफिक समस्या दूर करण्यासाठी प्रस्तावित मेट्रो मार्गामुळे ट्राफिक निश्चितच कमी होईल व शिरूर लोकसभेचा विकास होण्यासाठी महत्वाचा टप्पा ठरेल . यावेळी राज्याचे उपमुख्यमंत्री मा.ना अजितदादा पवार , खासदार डॉ आमोल कोल्हे , हडपसरचे आमदार श्री चेतन तुपे , खेडचे आमदार श्री दिलीप मोहिते पाटील,महानगर आयुक्त श्री विक्रम कुमार, महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्री ब्रिजेश दिक्षित व अधिकारी वर्ग उपस्थित होता .

Read more...

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करू नका राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आवाहन

९ वा राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराने नवरत्नांचा सन्मान

डॉ.संदीप मनोहर डोळे यांचा आरोग्यरत्न पुरस्काराने सन्मान

सजग वेब टिम, पुणे

पुणे | “ सार्वजनिक संपत्तीचे नुकसान होवू न देता शांततेच्या मार्गाने आंदोलन होणे गरजेचे असून हे शिक्षण विद्याथ्यार्ंना विद्यापीठामधून देणे गरजेचे आहे. जेव्हा आम्ही एकदुसर्‍यांची गोष्ट मान्य करू, तेव्हाच या विश्‍वात शांतता निर्माण होईल,”असे विचार महाराष्ट्रचे राज्यपाल महामहिम भगत सिंह कोश्यारी यांनी मांडले.

एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, पुणे,विश्‍वशांती केंद्र (आळंदी), माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूह, पुणे व भारत अस्मिता फाउंडेशन, पुणे यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या ९ व्या राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड राज्यस्तरीय पुरस्काराच्या प्रदान समारंभ प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहळ हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. अध्यक्षस्थानी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड हे होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध संगणक तज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हिर्सिटीचे कार्याध्यक्ष राहुल विश्‍वनाथ कराड, एमआयटी आर्ट डिझाइन अ‍ॅण्ड टेक्नॉलाजी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ.मंगेश तु. कराड आणि एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. एन.टी.राव हे उपस्थित होते.
यावेळी कृषीरत्न हा पुरस्कार विष्णुपंत केरू गायखे (रा.पळसे, ता.जि.नाशिक), समाजरत्न कुशावर्ता चंद्रशेखर बेळे (मु.पो.ता. देवणी, जि. लातूर), आरोग्यरत्न डॉ.संदीप मनोहर डोळे (मु.पो.नारायणगांव, ता.जुन्नर, जि.पुणे), शिक्षणरत्न सुधीर बाळासाहेब खाडे (नळदुर्ग,ता. तुळजापूर, जि.उस्मानाबाद), क्रीडारत्न ऋचा राहुल धोपेश्‍वर (पुणे), ग्रामरत्न पुरूषोत्तम अंबादास घोगरे (खिरगव्हाण समशेरपूर, जि. अमरावती), बचतगटरत्न पुजा नितीन खडसे (दोंडाईचे, ता. सिंदखेड, जि. धुळे), जनजागरण रत्न जयप्रकाश आसाराम दगडे (लातूर) व अध्यातरत्न ह.भ.प. सुधाकर महाराज इंगळे (मु.पो. राजेश कोठे नगर, सोलापूर) यांना प्रदान करण्यात आले. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, स्मृती चिन्ह, संत श्री ज्ञानेश्‍वर माऊलीची प्रतिमा व प्रत्येकी रू.११,००० रोख असे या पुरस्काराचे स्वरूप होते. या वेळेस ‘राष्ट्रधर्मपूजक दादाराव कराड नवरत्न परिचय’ पुस्तकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते झाले.

राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले,“ फीट इंडियासाठी सर्वांना प्रयत्न करणे गरजेचे आहे. आज समाजातील मत भिन्नतेमुळे शांती निर्माण होऊ शकत नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना असे शिक्षण देणे गरजेचे आहे, की ज्यामुळे सरकारी संपत्तीचे नुकसान होणार नाही. विश्‍व शांतीसाठी सर्वप्रथम आत्मज्ञान होणे गरजेचे आहे. समाज एकत्रित आणण्यासाठी या देशात गणेशोत्सवाची सुरूवात झाली होती. पण, आज याची स्थिती वेगळी झाली आहे. या वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीने जे नऊरत्न शोधले त्यामुळे नक्कीच येथील विद्यार्थी हा नवरत्नसारखा बनेल.”

मुरलीधर मोहळ म्हणाले,“ शिक्षण व संस्कृतीची पार्श्‍वभूमी लाभलेल्या या पुण्यनगरीत डॉ. कराड यांनी शून्यातून शिक्षणाचे काम सुरू केले आहे. ही संस्था सामाजमन व सामाजिक बांधिलकी ओळखते. या पुरस्कारचा मुख्य उद्देश हाच आहे की समाजात चांगले कार्य घडत रहावे. दादाराव कराड यांच्या विचारातून व मार्गदर्शनातून समाजात लोक चांगले कार्य करतील.”

प्रा.डॉ.विश्‍वनाथ दा. कराड म्हणाले,“ ही संस्था स्वामी विवेकानंद यांच्या तत्वज्ञानावर कार्य करीत आहे. स्वातंत्रसेनेच्या रूपाने कार्य करणारे आमचे वडील खर्‍या अर्थाने ते राष्ट्रधर्मपूजक होते. या देशाला ‘वसुधैव कुटुंबकम’ची वैश्‍विक परंपरा आहे. भगवदगीता व ज्ञानेश्‍वरी हे धार्मिक ग्रंथ नसून ते जीवन ग्रंथ आहे. भारतीय संस्कृतीचे छोटे दर्शन येथे होत आहे. त्याग आणि समर्पणाचे येथे दर्शन घडले आहे. आपल्यासारख्या लोकांच्या कार्यातून भारत हा २१व्या शतकात विश्‍वगुरू म्हणून उदयास येईल.

डॉ. विजय भटकर म्हणाले,“ विश्‍वशांती व संस्कार देणारे हे विद्यापीठ पुढील काळात संस्कार देणारे पीठ बनेल. १३५ कोटीच्या लोकसंख्येच्या या देशातील गावा गावापर्यंत चांगले कार्य पोहचविण्याचे कार्य या विद्यापीठातून होत राहील.”
पुरस्काराला उत्तर देताना जयप्रकाश दगडे म्हणाले,“ मनापासून ऋण व्यक्त करतो. ज्यांचा येथे सत्कार होत आहे ते सर्व ग्रामीण भागातील हिरो आहेत. त्यांनी केलेल्या कामाचा आज खर्‍या अर्थाने गौरव झाला आहे. तळागळात काम करणार्‍या व्यक्तींचा शोध एमआयटीने पूर्ण केला. जगाला सध्या पर्यावरणाचा धोका आहे त्या दृष्टीने कार्य करावे अशी आशा त्यांनी व्यक्त केली.”
राहुल विश्‍वनाथ कराड यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की, आम्ही समाजातील उत्तम कार्य करणारे व्यक्ती ज्यांचे नाव अद्याप जनतेपर्यंत पोहचले नाही अशा व्यक्तिंचा येथे गौरव केला जात आहे. यांचे उदाहरण तरूण पिढीसमोर आदर्श ठेवण्याचा आमचा प्रयत्न आहे.

प्रा. गौतम बापट यांनी सूत्रसंचालन केले. प्रा.डॉ. मंगेश तु. कराड यांनी आभार मानले.

Read more...

सत्यशील शेरकर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

शेरकर यांना सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार प्रदान

सजग वेब टिम, जुन्नर

संगमनेर | दंडकारण्य अभियानाचे प्रणेते सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व कृषी औद्योगिक क्रांतीचे प्रणेते डॉ.अण्णासाहेब शिंदे यांच्या संयुक्त जयंती निमित्त आज रविवार, दि.१२ रोजी मालपाणी लॉन्स, संगमनेर येथे प्रेरणादिन पुरस्कार व सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या वर्षीचा ‘स्वातंत्रसैनिक भाऊसाहेब थोरात स्मृती पुरस्कार’ एबीपी माझा चे मुख्य संपादक राजीव खांडेकर यांना, तर कृषी शिक्षण व संशोधन क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल ‘डॉ अण्णासाहेब शिंदे स्मृती पुरस्कार’ पर्यावरण तज्ञ डॉ गिरीश गांधी यांना प्रदान करण्यात आला.

तसेच थोरात सेवाभावी संस्थेचा ‘सहकारातील सामाजिक कार्यकर्ता पुरस्कार’ शिरोली बु| येथील श्री विघ्नहर सह. साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर व त्यांच्या सुविद्य पत्नी योगिता शेरकर यांना राजस्थानचे उपमुख्यमंत्री सचिन पायलट, महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते व महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली व आमदार डॉ.सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आला. ह्यावेळी शेरकर यांच्या मातोश्री सुमित्राताई शेरकर, थोरात कारखान्याचे चेअरमन माधवराव कानडे तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर व दादांचा मित्र परिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.

सत्यशिल शेरकर यांचे कमी वयात सहकार क्षेत्रात पदार्पण, विघ्नहर साखर कारखान्याच्या माध्यमातून सभासदांच्या ऊसाला सर्वाधिक भाव, कारखान्याची मागील निवडणूक बिनविरोध,१८ मेगावॉटचा वीज प्रकल्प तसेच विविध सहकारी संस्थाचा मुख्य पदभार स्विकारून त्या ठिकाणी योग्य निर्णय आणि उत्तम कामगिरी व याच बरोबर ही सर्व जबाबदारी पेलत असताना त्यांच्या पत्नी योगिता शेरकर यांची मिळालेली साथ व महिला वर्गासाठी त्यांनी दिलेले योगदान अशा आदी निकषांवर निवड समितीने निवड केली होती. ५१ हजार रुपये व सन्मानचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

शेरकर यांच्या नेतृत्वाखाली विघ्नहर कारखान्याला देश व राज्य पातळीवरील पुरस्कार मिळाले आहेत तसेच भारतीय शुगर संस्थेचा देश पातळीवरील ‘भारतीय युथ आयकॉन ऑफ शुगर इंडस्ट्रीज’ हा मानाचा पुरस्कार मिळालेला आहे. आजच्या राज्यस्तरीय ‘सहकारातील सामाजिक कार्यकर्ता’ पुरस्काराने जुन्नर तालुक्याच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेला आहे असे दिसून येते.

Read more...

रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामांना प्राधान्य द्या – आशिष शर्मा

रस्त्यांच्या कामासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामांना प्राधान्य द्या – आशिष शर्मा

सजग वेब टिम, पुणे

पुणे दि. 9| पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गासह महामार्गाच्या कामांना गती येण्यासाठी जमिनीच्या भूसंपादनाची कामे प्राध्यान्याने करावीत, यासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (एनएचएआय) आणि महसूल विभागाच्या भूसंपादन शाखेने समन्वयाने काम करण्याच्या सूचना भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे वित्तीय संचालक आशिष शर्मा यांनी केल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन बैठक भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे संचालक (वित्तीय) आशिष शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी विभागीय आयुक्त डॉ दीपक म्हैसेकर, पुणे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, सातारा जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, “एनएचएआय”चे राजीव सिंह यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

श्री आशिष शर्मा म्हणाले, पुणे विभागातील राष्ट्रीय राजमार्गांची कामे सुरु आहेत. मात्र काही ठिकाणी कामे रखडली आहेत. ज्या ठिकाणी कामे रखडली आहेत, त्या ठिकाणी भूसंपादनाचे विषय प्रलंबित असतील तर ते तातडीने सोडविण्याची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी भूसंपादनाची कायदेशीर प्रक्रीया पूर्ण झाली आहे, मात्र त्या ठिकाणी काही अडथळे येत असतील तर त्या ठिकाणी पोलीस बंदोबस्तात काम सुरू करावे. अशा कोणत्या आणि किती ठिकाणी पोलीस बंदोबस्ताची आवश्यकता आहे, त्याचा आकृतीबंद तयार करून तो एनएचएआयने महसूल विभागाला सादर करावा. राष्ट्रीय राजमार्गाची प्रस्तावीत कामे पूर्ण करण्यासाठी नेमकी किती जमिन आवश्यक आहे, त्याची यादी करण्याची सूचना त्यांनी केली.

तसेच पुणे-सातारा महामार्गाचे कामही रखडलेले असून या मार्गावरील खेड-शिवापूर टोल नाक्यावर आणि परिसरात वाहनकोंडीचा सामना प्रवशांना वारंवार करावा लागतो. या टोलनाक्यावर वाहनांच्या टोल आकारणीचे योग्य नियोजन नसल्यामुळेच या समस्या उद्भवत असाव्यात, या प्रकणी एनएचएआयच्या अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याच्या सूचना श्री शर्मा यांनी केल्या. या रस्त्याच्या कामाला गती देण्यासह वाहनधारकांच्यात फास्ट टॅग विषयी जनजागृती करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

चांदणी चौकाच्या कामाला प्राधान्य
चांदणी चौक उड्डाणपूलासाठी आवश्यक असलेल्या 37 मिळकतीचे 2.94 हेक्टर क्षेत्राच्या भूसंपादनाचे प्रस्ताव जिल्हाधिकारी यांनी पुणे महानगरपालिकेकडे पाठविले आहेत. त्यासाठी आवश्यक असणारी 30 टक्के रक्कम पुणे महानगरपालिकेने जमा केल्यानंतर या कामाला प्राधान्य देत भूमी अभिलेखच्या जिल्हा अधिक्षकांनी कालमर्यादेत करून देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिल्या. या कामासाठी एनडीएची काही जागा संपादीत करणे आवश्यक आहे, त्यासाठी त्यांच्याकडून भरपाई म्हणून 16 कोटींसह त्यांच्या कमानीच्या पुनर्रबांधणीची त्यांची मागणी आहे. या बाबतही संरक्षण विभागाशी वरिष्ठ स्तरावर चर्चा सुरू असून याबाबतही तातडीने तोडगा काढण्यात येत असल्याचे डॉ. म्हैसेकर यांनी सांगितले.

या बैठकीत खेड-सिन्नर, संत तुकाराम पालखीमार्ग, संत ज्ञानेश्वर पालखी मार्ग, पुणे विभागातील सांगली व सोलापूर जिल्ह्यातून जाणारा रत्नागिरी-नागपूर महामार्ग या रस्त्यांच्या कामाचा व त्यासाठी आवश्यक भूसंपादनाच्या कामाचा आढावा घेण्यात आला.
या बैठकीला सातारा, सांगली, सोलापूर, पुणे जिल्ह्यातील भूसंपादन अधिकारी तसेच एनएचएआयचे अधिकारी उपस्थित होते.

Read more...

गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करा -डॉ.दीपक म्हैसेकर (विभागीय आयुक्त)

गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करा -डॉ.दीपक म्हैसेकर

सजग वेब टिम , पुणे

पुणे | पुणे विभागात रेल्वेच्या कामासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादन प्रक्रीयेला गती द्यावी, त्यासाठी गावनिहाय शेतकऱ्यांच्या भूसंपादनाचे प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी आज केल्या.

येथील विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात पुणे विभागातील रेल्वेमार्ग भूसंपादनाबाबत आढावा बैठक विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुण्याचे जिल्हाधिकारी नवल किशोर राम, साताऱ्याच्या जिल्हाधिकारी श्वेता सिंघल, उपायुक्त जयंत पिंपळगावकर, रेल्वेच्या पुणे विभागाचे उपमुख्‍य अभियंता सचिन पाटील, मिरज विभागाचे कार्यकारी अभियंता सागर चौधरी, अभियंता विकास कुमार, सोलापूरचे भूसंपादन अधिकारी हेमंत निकम, फलटणचे प्रांताधिकारी शिवाजी जगताप, कराडचे प्रांताधिकारी उत्तम डिगले, कोरेगावच्या प्रांताधिकारी किर्ती नलावडे, पंढपूरचे रविंद्र पिसे, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) सुरेखा माने, रेल्वेचे कायदे सल्लागार ॲड. जितेंद्र पाटील उपस्थित होते.

डॉ. दीपक म्हैसेकर म्हणाले, पुणे विभागातील रेल्वेमार्गाच्या कामाचा आढावा रेल्वे मंत्र्यांनी घेतला असून ही कामे तातडीने मार्गी लावण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आहेत. रेल्वेमार्गासाठी आवश्यक असणाऱ्या भूसंपादनाच्या कामाला गती देण्याची आवश्यकता आहे. रेल्वेमार्गासाठी नेमक्या किती जमिनीची आवश्यकता आहे, त्यासाठी किती शेतकऱ्यांच्या जमिनी जातात, याचा आराखडा तयार करावा. तसेच ज्या ठिकाणी रेल्वेमार्गावर अंडर पास अथवा जोड रस्त्यांची आवश्यकता आहे, त्याची ही माहिती तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. या कामाला प्राधान्य देण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

यावेळी बारामती-फलटण-लोणंद ब्रॉड गेज नवीन लाईन, पुणे-मिरज ब्रॉड गेज दुहेरी रेल्वे लाईन, कराड रेल्वे लाईनच्या मार्गासाठीच्या भूसंपादनाचा आढावा घेण्यात आला.
*****

Read more...

बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळ निर्णय पणन विभाग
कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय

सजग वेब टिम, मुंबई

मुंबई | कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर करण्यात आलेल्या विशेष निमंत्रितांच्या (तज्ज्ञ संचालक) पदाच्या नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. तज्ज्ञ संचालक नियुक्त करण्यासाठीची महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन (विकास व विनियमन) अधिनियम 1963 मधील यासंदर्भातील तरतूद देखील वगळण्याचा निर्णय घेण्यात आला.

या अधिनियमानुसार 13 जून 2015 पासून तज्ज्ञ संचालकांच्या नियुक्त्यांसाठी तरतूद करण्यात आली होती. ही तरतूद रद्द करण्याबाबत अध्यादेश काढण्याचा प्रस्ताव राज्यपालांकडे पाठविण्यास मान्यता देण्यात आली. तसेच मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निर्णय लक्षात घेऊन आतापर्यंत केलेल्या नियुक्त्या प्रकरणपरत्वे रद्द करण्याबाबतचा निर्णय घेण्यास देखील मान्यता देण्यात आली.

Read more...
Open chat
Powered by