डिजिटल युगातील स्मार्ट उद्योजक अरुण काळे

 

“डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.”

स्मार्ट फोनच्या जमान्यात अरुण काळे यांनी ’स्मार्ट उद्योजक’ होण्याचा निर्णय घेतला आणि इतर उद्योजकांना याचा कसा फायदा मिळेल, या विचाराने डिजिटल मार्केटिंग हा आव्हानात्मक उद्योग सुरू केला. त्यांच्या व्यवसायाला ‘महालक्ष्मी पब्लिसिटी’ या नावाने ओळख मिळाली अरुण काळे म्हणतात,

‘‘डिजिटल मार्केटिंग हे पारंपरिक मार्केटिंगपेक्षा वेगळे नाही; फक्त मार्केटिंगची पद्धत बदलली आहे. अनेक उद्योग सुरू होतात, मात्र ते त्यांच्या एका ठराविक कक्षेपुरतेच मर्यादित राहतात. यामुळेच मी इतर उद्योगांना बळ देणारा उद्योग सुरू करण्याचा निर्णय घेतला. व्यवसाय करणे माझ्यासाठी सोपे नव्हते; कारण मला व्यवसाय कसा करावा, हे अजिबात माहीत नव्हते.

काही दिवस घरूनच काम करण्याचा निर्णय घेतला. एक लॅपटॉप आणि डेटा कार्डच्या मदतीने ‘डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय घरूनच सुरू झाला. अनेक चांगले ग्राहक मला मिळत गेले. त्यातूनच आर्थिक बळासह आत्मविश्‍वास दुणावला. लोक मोबाईल फोन आणि लॅपटॉप अधिक वापरत असल्याने कंपन्यांचा डिजिटल मार्केटिंगवर भर असतो. एकूणच व्यवसाय ‘लोकल टू ग्लोबल’ करण्यासाठी ते महत्त्वाचे आहे. लोकांचे प्रॉडक्‍ट (उत्पादन) किंवा सर्व्हिसेस (सेवा) किंवा ब्रॅंडबद्दल जागरूकता निर्माण करून त्यांची विक्री कशी वाढवता, येईल यासाठी मी प्रयत्न करत गेलो.’’अनेक उद्योजक सुरवातीला स्वतःची वेबसाइट बनवण्यासाठी आग्रही असायचे, पण फक्त वेबसाइट बनवून किंवा व्यवसाय सुरू करून कधीच बिझनेस मिळत नाही. ती वेबसाइट किंवा तुमचा व्यवसाय लोकांपर्यंत पोचायला हवा. हेच अरुण काळे यांनी प्रत्येक वेबसाइट बनवणऱ्याला सांगितले.अशा पद्धतीने एक-एक प्रॉडक्‍ट वाढत गेला आणि त्यांची कंपनी आज डिजिटल मार्केटिंगच्या १५ ते २० सर्व्हिसेस देते.

डिजिटल मार्केटिंग करण्यासाठी वेबसाइट, सोशल मीडिया, सर्च इंजिन, गुगल ॲडव्हाइस, मोबाईल ॲप्स, ई-मेल यांसारख्या विविध इंटरनेटवरील माध्यमांचा वापर केला जातो.सध्या जगातील एकूण इंटरनेट यूजरपैकी ८० टक्‍क्‍यांहून अधिक लोक स्मार्ट फोनचा वापर करत असल्याने या लोकांपर्यंत पोचण्यासाठी आपल्या कंपनीचे, वस्तू किंवा सेवांची माहिती असलेले मोबाईल ॲप तयार करणे ही आजच्या काळाची गरज आहे. कंपनीच्या मोबाईल ॲप्सद्वारे लोक त्यांना हव्या असलेल्या वस्तू किंवा सेवा विकत घेऊ शकतात. डिजिटल मार्केटिंग ही बदलत्या काळाची गरज आहे. अरुण काळे म्हणतात, ‘‘प्रत्येक व्यवसायात चांगला फायदा मिळविण्यासाठी डिजिटल मार्केटिंगचा आराखडा असणे गरजेचे आहे.

त्यामुळे सध्याच्या जगात कसला ’ट्रेंड’ सुरू आहे, हे ओळखून कौशल्य मिळवा आणि कामाला लागा. यश स्वतःहून तुमच्याकडे चालत येईल. सध्या हा माझा व्यवसाय चाकण या शहरात चालु आहे .
वर्षाला एक ते दोन लाख रुपये मिळायचे. आता व्यवसायात वाढ करून व्यवसाय पाच ते सहा लाखापर्यंत पोचला आहे. मी आतापर्यंत 70 हुन अधिक लोकांना रोजगार दिला,नाशिक,जुन्नर ,आंबेगाव ,राजगुरुनगर,चाकण,पुणे,भोसरी,सतारा,बारामती या ठिकाणी माझी कंपनी सर्व्हिस देण्याचे काम करत आहे.

अनेक युवा तरुण व्यवसायिकांना हा ’डिजिटल मार्केटिंग’चा व्यवसाय कसा सुरू करायचा हे सांगितले आहे. ज्यांनी नुकताच व्यवसाय सुरू केला आहे, त्यांना मी एवढेच सांगेन की, प्रामाणिकपणे काम करा. ग्राहकांना सांभाळा, तुमची सर्व्हिस चांगली द्या आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचा. यावरच कोणत्याही व्यवसायाचे यश अवलंबून असते.

पुढील येत्या काळात जाहिरातीच्या नवनवीन संकल्पना तयार करुन त्यावर कामे केले जाईल असे अरुण काळे यांनी आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हंटले आहे.

Read more...

नारायणगाव महाविद्यालयात लोकसंख्या वाढ विषयावर जनजागृती कार्यक्रम 

सजग वेब टिम, जुन्नर (अशफाक पटेल)

नारायणगांव | ग्रामोन्नती मंडळाच्या कला,वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे प्राध्यापक डॉ. शिरीष पिंगळे यांनी ध्वनिप्रदूषण कमी करण्यासाठी मार्गदर्शन केले.

त्यात त्यांनी ध्वनिप्रदूषण कसे निर्माण होते, त्याचे मानवी जीवनावर होणारे परिणाम या बद्दलची माहिती सांगितली. त्यांनतर उपप्राचार्य डॉ. जी. बी. होले सरांनी लोकसंख्या नियंत्रण जनजाग्रुती यांवर मार्गदर्शन त्यात त्यांनी लोकसंख्या वाढीमुळे होणारे परिणाम याबद्दल सांगितले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॅडेट प्रतीक ढवळे याने केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक एन. सी. सी विभागप्रमुख डॉ. दिलीप शिवणे सरांनी केले.व प्रमुख पाहुण्यांची ओळख कॅडेट लक्ष्मी बोंबे हिने करून दिली. कार्यक्रमाला उपस्थित डॉ. टाकळकर सर, डॉ. कसबे सर आणि डॉ. पठारे सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व एस. यू. ओ. विवेक वायकर याची एन .सी. सी. विदयार्थी प्रतिनिधी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. या सर्व कार्यक्रमाचे आभार कॅडेट शिवानी चव्हाण हिने मानले. त्यांनतर छात्रसेनेच्या विद्यार्थ्यांनी लोकसंख्या जनजागृतीसाठी रॅली, कार्यशाळा, व पथ नाटकांचे सादरीकरण व तसेच विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

या सर्व कार्यक्रमास एन सी सी चे १०० कडेटस उपस्थित होते आणि त्यांनी उत्स्फूर्त प्रतिसादही दिला.या सर्व कार्यक्रमामध्ये ग्रामोन्नती मंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटे,कार्याध्यक्ष अनिल मेहेर,कार्यवाह रवींद्र पारगावकरआणि इतर सर्व मंडळींचे मार्गदर्शन लाभले.

Read more...

आंबेगाव तालुक्यात महासुविधा केंद्राच्या दिरंगाई ला पालक,विद्यार्थी वैतागले

विद्यार्थ्यांना शैक्षणिक कामासाठी दाखले मिळेना वेळेत

सजग वेब टिम, आंबेगाव

लोणी-धामणी | आंबेगाव तालुक्यात विद्यार्थ्यांना महासुविधा केंद्र व प्रशासनाकडून विविध शैक्षणिक प्रवेशासाठी आवश्यक असे विविध प्रकारचे दाखले मिळताना प्रशासनाच्या आडमुठेपणाला तसेच दिरंगाई ला सामोरे जावे लागत आहे.ज्यामुळे संबंधीत विद्यार्थी व त्यांचे पालक यांना मानसिक तणावाला सामोरे जावे लागत आहे. वेळेत कागदपत्र न मिळाल्याने विद्यार्थी प्रवेशापासून वंचित राहण्याचा धोका यामुळे निर्माण होऊ शकतो यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाल्यास शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे व कार्यसम्राट मा.खासदार शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विरोधात युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात अभियांत्रिकी, औषधनिर्माणशास्त्र, वैद्यकीय, व्यवस्थापन, कृषी व इतर विद्या शाखांतील अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू असून सदर प्रवेशप्रक्रियेसाठी विविध प्रकारचे दाखले व प्रमाणपत्रांची आवश्यकता असते. आंबेगाव तालुक्यातील बहुतांशी भाग ग्रामीण व दुर्गम असल्याने ह्या भागातील मुलांना दाखले व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी महासुविधा केंद्रांवर व तहसील कचेरीत वारंवार हेलपाटे मारावे लागत आहेत. दाखले वितरित करण्यासाठी शासनाने विहित मुदत देखील ठरवून दिली आहे. मात्र याचे पालन प्रशासनाकडून केले जात नाही.

सुविधा केंद्रातील विद्यार्थ्यांचे प्राप्त अर्ज केंद्र चालकांकडून वेळेत संगणकावर अपलोड न केल्याने तसेच दाखले मंजूर करण्यासाठी तहसील प्रशासनाकडून विलंब होत असल्याने आंबेगाव तालुक्यातील शेकडो विद्यार्थी विविध शाखांच्या प्रवेशापासून वंचित राहण्याची शक्यता आहे.

विद्यार्थ्यांच्या ह्या प्रश्नांवर युवासेनेचे राज्य विस्तारक मा.सचिन बांगर यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेच्या शिष्टमंडळाने विद्यार्थ्यांसमवेत आज तहसीलदार श्रीमती सुषमा पैकीकरी मॅडम यांची भेट घेऊन युवासेनेच्या वतीने याबाबत निवेदन दिले. विद्यार्थ्यांच्या सर्व अर्जांची लगेच पडताळणी करून सर्व विद्यार्थ्यांना तात्काळ दाखले व प्रमाणपत्रे वितरित करण्यात यावीत तसेच एकही विद्यार्थी कागदपत्र व प्रमाणपत्रांअभावी प्रवेशापासून वंचित राहू नये याची खबरदारी तहसील प्रशासनाने घ्यावी अन्यथा युवासेनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे यावेळी सचिन बांगर यांनी म्हटले आहे. तसेच विद्यार्थ्यांनी देखील आवश्यक दाखले मिळवण्यासाठी मुदतीपूर्वीच अर्ज दाखल करावेत असे आवाहनही युवासेनेच्या वतीने करण्यात आले.

यावेळी शिवसेनेचे मा.उपतालुकप्रमुख मिलिंद काळे, आंबेगाव तालुका शिवसेना आय.टी. सेल संघटक देविदास आढळराव पाटील, ग्राहक संरक्षक कक्षाचे तालुका अध्यक्ष अमोल काळे, शिवसेना गटप्रमुख धनेश शेवाळे, सुनिल बांगर यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते.

Read more...

नारायणगाव येथे एमपीएससी – युपीएससी अभ्यासिकेचे उद्घाटन संपन्न

नारायणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना होणार अभ्यासिकेचा फायदा

सजग वेब टिम, नारायणगाव

नारायणगाव| ग्रामपंचायत नारायणगावच्या माध्यमातुन श्री. छत्रपती शिवाजी सार्वजनिक वाचनालय येथे सुरु करण्यात अालेल्या MPSC – UPSC अभ्यासिकेचे उद्घाटन नोबेल पुरस्कार विजेते जलपुरुष राजेंद्रसिंह राणा व महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिक्षक अभियंता सुभाष भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले. या अभ्यासिकेचा फायदा स्पर्धा परिक्षेची तयारी करणार्‍या विद्यार्थ्यांना होणार असून अभ्यासिका सुरु केल्याबद्दल नागरिकांनी ग्रामपंचायतचे कौतुक केले आहे.

यावेळी गटविकास अधिकारी विकास दांगट, सरपंच योगेश पाटे, मनिषा मेहेत्रे, संतोष दांगट, बाळासाहेब पाटे, आरिफ आतार, राजेश बाप्ते, भागेश्वर डेरे, ड‍ाॅ.संदिप डोळे, नितीन नाईकडे यांसह ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...

स्पर्धेत टिकण्यासाठी विद्यार्थ्यांना अबॅकस गणिती तंत्र शिकवणे गरजेचे – प्रा.अशफाक पटेल

पामा इंडियाचे काम कौतुकास्पद – बी.व्ही.मांडे

ओझर | पामा इंडिया या आंतरराष्ट्रीय संस्थेच्या माध्यमातून घेण्यात येणारी राष्ट्रीय पातळीवरील बौद्धिक गणित स्पर्धा (अबॅकस) श्री क्षेत्र ओझर येथे (दि ५ व ६ जुन ) रोजी मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत पामा इंडियाचे सुमारे पंधराशे विद्यार्थी सहभागी झाले होते. भारताच्या विविध भागातून स्पर्धेत सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांमधून 19 व्या ग्लोबल आंतरराष्ट्रीय अबॅकस स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. तसेच दरवर्षी या स्पर्धेसाठी चोवीस देशातून विद्यार्थी सहभागी होत असतात अशी माहिती पामा इंडिया चे चेअरमन आबाजी काळे यांनी दिली.

या स्पर्धेच्या बक्षीस वितरण प्रसंगी पामा इंडियाच्या उपाध्यक्षा शिल्पा काळे, संचालक शिवराज पाटील, विघ्नहर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष बी.व्ही.मांडे, युवा सेना जिल्हाप्रमुख गणेश कवडे, अॅड. कुलदीप नलावडे, प्रा.अशफाक पटेल, सरपंच अस्मिता कवडे, दिग्दर्शक विजय झिंजाड, रामदास कुटे, ह.भ.प दर्शन महाराज कबाडी, कलाध्यापक संघाचे कुसाळकर सर, या प्रमुख पाहुण्यांसह आकाश रायकर, तेजस बोर्‍हाडे, मनीषा अौटी, विजय कुर्‍हाडे, सुप्रिया मोढवे, श्रीतिजा वामन, अॅड.रत्ना हांडे, नमिता दांगट, विकास काळे हे उपस्थित होते.

या स्पर्धेच्या बक्षिस वितरण प्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष बी.व्ही.मांडे यांनी पामा इंडियाच्या उपक्रमाचे जुन्नरचे सुपुत्र असल्याने आबाजी काळे यांचा अभिमान असल्याचे सांगत विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या. तर प्रा.अशफाक पटेल यांनी सध्याचे स्पर्धेचे युग पाहता विद्यार्थ्यांना अबॅकस सारखे गणिती तंत्र शिकवणे गरजेचे असुन ही अत्याधुनिक तंत्रप्रणाली शिकणारे विद्यार्थी भविष्यात देशाच्या प्रगतीला हातभार लावु शकतात असे सांगत यश संपादन करणार्‍या विद्यार्थ्यांचे व पालकांचे कौतुक करत आयोजकांना शुभेच्छा दिल्या.

या स्पर्धेतील विद्यार्थ्यांना मास्टर अबॅकसचे संचालक शिवराज पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. पामा इंडिया नॅशनल अबॅकस या भव्यदिव्य स्पर्धेचे मॅनेजमेंट ड्रीम्स स्पार्क इव्हेंट मॅनेजमेंटने केले तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ड्रीम्स स्पार्क इव्हेंटचे चेअरमन गणेश मोढवे यांनी केले.

Read more...

समर्थ शैक्षणिक संकुलात ५५ पदवी व पदव्युत्तर प्रवेश सेतू सुविधा

सजग वेब टिम, जुन्नर (सुधाकर सैद)
बेल्हे | समर्थ रूरल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट संचलित बेल्हे येथील शैक्षणिक संकुलात अभियांत्रिकी सह विविध अभ्यासक्रमांचे प्रवेश सेतू केंद्र कार्यान्वित होणार असल्याची माहिती प्रा.राजीव सावंत यांनी दिली.राज्यात या वर्षीपासून अभियांत्रिकी, फार्मसी, आर्किटेक्चर, अॕग्रीकल्चर, एम बी ए, एम सी ए, बी एड, विधी, हॉटेल मॅनेजमेंट,डेअरी टेक्नॉलॉजी आदींसह ५५ पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांचे प्रवेश सेतू सुविधा केंद्रामार्फत करण्याचा निर्णय प्रवेश नियामक प्राधिकरण आणि राज्य सामायिक परीक्षा कक्षाने घेतला आहे.
सर्वच अभ्यासक्रमांचे प्रवेश एकाच छताखाली होणार असल्याने पालक व विद्यार्थ्यांची प्रवेशासाठीची वणवण थांबणार असल्याचे फार्मसी चे प्राचार्य डॉ.वैभव आहेर यांनी सांगितले.हे सुविधा केंद्र समर्थ शैक्षणिक संकुलातील पुरेसे संगणक व आवश्यक असणारे तंत्रज्ञान उपलब्ध असल्याने प्रदान करण्यात आलेले आहे.या सेतू केंद्रामध्ये विद्यार्थ्यांना प्रत्येक अभ्यासक्रमाची,प्रवेश पात्रतेची, महाविद्यालयाची माहिती उपलब्ध असणार आहे.
विशेष म्हणजे प्रत्येक महाविद्यालयाचा विडिओ,तेथील पायाभूत सुख सुविधा, अभ्यासक्रम,परिसर,शैक्षणिक शुल्क आदी सर्व बाबींची माहिती ‘सफलता डॉट ओआरजी’ या संकेतस्थळावर पाहता येईल व विद्यार्थी घरबसल्या आपला प्रवेश कुठे घ्यायचा हे निश्चित करू शकेल अशी माहिती अभियायांत्रिकी महाविद्यालयाचे डीन डॉ.दिपराज देशमुख यांनी दिली.हे सुविधा केंद्र सुरू झाल्याने प्रवेशापासून कुठलाही विद्यार्थी अपुऱ्या माहितीमुळे वंचित राहणार नाही असा ठाम विश्वास अभियांत्रिकी चे प्राचार्य डॉ.अण्णासाहेब गोजे यांनी व्यक्त केला.
Read more...

खासदार अमोल कोल्हे यांच्या विविध शासकीय कार्यालयांमध्ये मॅरेथॉन बैठका

खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी विविध शासकीय कार्यालयांमध्ये जाऊन अधिकाऱ्यांकडून घेतला कामाचा आढावा

पुणे | शिरूर चे नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी काल (शुक्रवारी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य विद्युत वीज वितरण, बीएसएनएल, सार्वजनिक बांधकाम विभाग, डीआरएम (रेल्वे विभाग) व सिंचन विभाग आदी विभागांना भेट देऊन त्या-त्या विभागांच्या कामाचा आढावा घेतला.
या आढावा बैठकीत पहिली बैठक रास्ता पेठेतील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महावितरण कार्यालय येथे झाली. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी भेट देऊन महावितरणचे प्रमुख अधिकारी यांच्याबरोबर बैठक घेऊन मतदारसंघातील विजेच्या समस्यांचा आढावा घेतला. शिरुर लोकसभा मतदारसंघातील जनतेचे महावितरणमधील विविध प्रश्न सोडवण्यासाठी खासदार डॉ. कोल्हे यांनी अधिकाऱ्यांसमवेत चर्चा केली व विविध प्रलंबित मागण्यांसाठी व उपाय योजनांसाठी सुचना दिल्या. त्यानंतर पुणे-सातारा रोडवरील बीएसएनएल विभागाच्या मुख्य कार्यालयाला भेट दिली. सेंट्रल बिल्डिंग मधील सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट दिली.

पुणे स्टेशन येथील डीआरएम विभाग येथे पुणे नाशिक रेल्वे प्रकल्प संदर्भात रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सविस्तर माहिती घेतली. यांसह विविध कार्यालयांना भेट देऊन सर्व वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून शिरूर लोकसभा मतदार संघातील विविध प्रलंबित कामे, योजना, अधिकाऱ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेतल्या. या विभागांचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्यासमवेत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद, माजी आमदार दिलीप मोहिते, अशोक पवार, जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग पवार, मोहित ढमाले, कुसुम मांढरे, गणपतराव फुलवडे, अमित बेनके, तुषार थोरात सर्व विभागांचे वरिष्ठ व कनिष्ठ अधिकारी, आदी मान्यवर उपस्थित होते.

Read more...

तब्बल २३ वर्षांनी पुन्हा भरली शाळा, आठवणींना उजाळा

बेल्हे | १९९६-९७ च्या इयत्ता १० च्या माजी विद्यार्थी स्नेह मेळावा आणि गुरुजन व कर्मचारी यांचा “कृतज्ञता सन्मान सोहळा” २मे  २०१९, रविवार रोजी सकाळी ११ वाजता बेल्हे  येथील श्री.बेल्हेश्वर विद्यालय या शाळेत यशस्वी रित्या पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात दीप-प्रज्वलनाने व कर्मवीरांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. स्नेहमेळाव्याच्या निमित्ताने आलेल्या माजी शिक्षकांनी मार्गदर्शन करताना प्रत्येकाने स्वतःची ताकत ओळखून समाजाची आणि स्वतःची प्रगती केली पाहिजे तसेच सवांदातून सर्व प्रश्न सोडविता येतात त्यामुळे सवांद फार महत्वाचा आहे, तुम्ही स्वतःला असे घडवा कि तुमच्या मुला/मुलींनी तुमच्याकडूनच सर्व चांगले गुण आणि संस्कार घेतले पाहिजे तसेच फक्त पैशाच्या मागे न धावत आत्मिक समाधान सुद्धा फार महत्वाचे असते,त्यामुळे पैसा जरून कमवा परंतु तो किती आणि कसा कमावताय हे महत्वाचे आहे तसेच तो योग्यवेळी आणि योग्यठिकाणी खर्चही करायला पाहिजे.

तसेच काही माजी विद्यार्थीनी आपल्या शाळेतील जुन्या आठवणी बोलून दाखवल्या,कार्यक्रमामध्ये सर्व शिक्षक/शिक्षिका तसेच शिपाईमामा यांचा विद्यार्थ्यांनी शाल,श्रीफळ देऊन कृतज्ञता सन्मान सोहळा पार पडला.

कार्यक्रम संपल्यांनंतर सर्व शिक्षक,कर्मचारी आणि विद्यार्थ्यांनी स्नेह भोजनाचा आनंद घेत शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा दिला.मान्यवरांचे स्वागत व सूत्रसंचालन प्रशांत गाडेकर यांनी केले तसेच जे शिक्षक व  वर्गमित्रांना देवाज्ञा झाली त्यांच्यासाठी श्रद्धांजली वाहण्यात आली. उपस्थितांचे आभार गणेश पोखरणा यांनी मानले. या स्नेहमेळाव्याचे आयोजन गणेश पोखरणा,कैलास भुजबळ,बाजीराव बांगर,निलेश औटी यांनी केले.

Read more...

Happy नसलेला पर्यावरण दिन

Happy नसलेला पर्यावरण दिन. 

सजग संपादकिय – तेजल देवरे

मानवी मन जितकं संवेदनशील आहे, कधी कधी तितकाच निष्ठूर मानवी स्वभाव भासतो. निसर्ग आपल्या गरजा पूर्ण करू शकतो; पण आपली हाव मात्र पूर्ण होऊ शकत नाही. असं गांधीजींनी विसाव्या शतकात सांगूनही आपण (किमान गांधीजींचे देशवासी) आपली हाव काही कमी करायला तयार नाही. म्हणजे एखाद्या महान व्यक्तिमत्वाला महात्मा, राष्ट्रपिता अशी संबोधनं लावून आपण विषयाला आवर घालत असतो. कारण त्यांचे विचार कृतीत आणणं जड़ जात असतं. कृती अवघड असू शकते पण सगळ्यांनी एकत्र येऊन करायचं ठरलं तर तिला सहजता प्राप्त होते. परंतू, सगळ्यांना एकत्रही यायचं नाहीये आणि ठरवायचं तर मुळीच नाहीये. खरंतर, आपण आपल्या आईसाठी काय करू शकतो? हा प्रश्न एकदा स्वतःला विचारायला हवा. उत्तर होकार्थी येते तर, सगळ्या सजीवांना पोटात घेणाऱ्या धरणीमाई बद्दल आता प्रश्न विचारायची वेळ आली आहे. आणि उत्तरांवर अंमलबजावणी करण्याची चालू क्षणा खेरीज दुसरी योग्य वेळ असूच शकत नाही. कारण पर्यावरणाचा ऱ्हास मानवाने केला आहे मग उपाययोजना देखील मानवानेच करायला हव्या.
पर्यावरणातील एक एक घटकाचे ऋण आपण जाणतो. वातावरणातील हवा, शिलावरणातील दगड, जलावरणातील पाणी आणि ह्या सगळ्यांना भेदणारे जीवावरण ही विविधतेला सामावून घेणारी एक उत्तम सांगड आहे. काही गरजा आणि त्यातून जन्म घेणारा स्वार्थ यामुळे ही सांगड मोडकळीला आली. पण जैव विविधतेचं महत्व आपण जाणतो तर त्यासाठी योगदान देणंही कर्मप्राप्तच आलं. शेवटी, आपणही ह्या विविधतेतीलच एक घटक आहोत. गोष्टी सामान्य माणसासाठी किंचित दूरच्या असल्या तरी माधव गाडगीळांसारखे काही ज्येष्ठ शास्त्रज्ञ आपलं सर्वस्व पणाला लावून फक्त पर्यावरणासाठी झटत असतात. सरकार येतात, जातात पण शास्त्रज्ञांनी वैज्ञानिक आधार घेऊन बनविलेले अहवाल मात्र सगळयांनाच खोट्या विकासाआड़ येणारे वाटतात. तसं असेल तर, का येतात आपत्ती? त्या खरंच 100 टक्के नैसर्गिकच असतात का? आता तरी ह्याचा विचार केला पाहिजे. अहवाल मान्य नसतील तर किमान त्यांचा विपर्यास करणे टाळले पाहिजे. अहवाल दडपणे सोपे आहे; पण सत्य कसे दडपले जाईल? ते आपत्तींच्या रूपाने सर्वांसमोर उभे ठाकतेच..
उत्तम वेव्हारे निसर्गा राखोनी।
विकास साधू या विवेकाने!
माधव गाडगीळांनी असं म्हणून मांडणी खुप सोपी केली. कमीत कमी पर्यावरणीय कायद्यांनुसार वागणे.. यात कोणाचेच काही नुकसान नाहीये. विकास तर जन्म घेईलच अधिक आपण जन्म घेतलेल्या सृष्टीचे सौंदर्य देखील अबाधित राहील. आणि येणाऱ्या पिढया सुद्धा सुरक्षित राहतील जेणेकरून त्यांना अजून एका ग्रहाला दूषित करण्याची संधी मिळता कामा नये. दिवंगत थोर वैज्ञानिक स्टीफेन हॉकिंग्स यांनी मानवाचा हावरट पणा असाच राहिला तर पृथ्वीचं पुनर्वसन करण्याची वेळ येईल असं काही वर्षांपूर्वीच म्हटलं होतं. म्हणजे पृथ्वी मानवाला राहण्यास अनुकूल असणार नाही; पण पर्यावरणाचा ऱ्हास होतो याचा अर्थ मानवी आरोग्यावरही त्याचा परिणाम होतो. तिकडे अंतराळात मानवी बुद्धीचा आविष्कार म्हणून संशोधन चालू असेल आणि इकडे सामान्य माणूस पृथ्वीवरची सोय संपली म्हणून ग्रह बदलासाठी तयार असतील. पण शरीरच साथ देत नसेल तर हा बदल नियम तरी काय कामाचा? आणि असं करणं म्हणजे आपल्या स्वार्थी पणाचं एक वेगळं रूप असेल ते..
व्यवस्था हे विसरून जाते की, ते स्वतः सुद्धा ह्या निसर्गाचे घटक आहेत आणि यामुळेच फक्त नफ्या पोटी बेकायदेशीर स्टोन क्रशर वापरले जाते. त्यामुळे खुप मोठ्या प्रमाणात धूलिकण हवेत विरतात. याचा परिणाम आरोग्यावर होतो. धुळीची एलर्जी असतांना इतके धूलिकण नाका तोंडात गेले तर श्वासोच्छवासाला अडचण येते आणि मनुष्यबळ एका तरहेने अकार्यरत बनते. बेकायदेशीर खाणकाम आणि त्याचे परिणाम यावर वृत्तपत्रांचे मथळे भरून आले तरी राज्यव्यवस्था आपले डोके भरून ही गोष्ट लक्षात घ्यावयास तयार नाही. हे असेच चालू राहिले तर सौन्दर्याचे भूषण असणारे पश्चिम घाट कधी दुःखाचे कारण बनेल सांगता येत नाही. जगभरात चांगले वाईट उदाहरणं तर आहेतच पण जवळच साध्या राज्यात आणि भारतातही त्यांची कमतरता नाही. माळीण सारखं एक संपूर्ण गांव नामशेष होतं म्हणजे काय? शेवटी निसर्ग हाच राजा असतो. त्याला समानते साठी कुठल्या कलमाची गरज नाही. तो हेच योग्य आहे म्हणून वेळेत न्याय निवाड़ा करतो. आपण त्याला ओरबाडलं तर तो आपल्याला स्वतःच्याच मातीत जागा देतो.
पर्यावरणाचा विचार करणं म्हणजे अविकसितपणाचं ते लक्षण आहे. असं वाटतं असेल तर जगातील सगळ्यात आनंदी, प्रगत आणि निसर्गाला पूरक अशा नॉर्वे, डेन्मार्क, जर्मनी, आणि स्वीडन या राष्ट्रांकड़े पाहिले पाहिजे.
संध्याकाळी नदीच्या काठी बसून आयुष्याचा आनंद घेणे वगैरे सारख्या कल्पना, पुढच्या काही पिढ्यां साठी भाकड कल्पना म्हणूनच उरण्याची भीती वाटते. कारण अलिकडे, नदयांचं संवर्धन नाही झालं तर त्या हळू हळू नष्ट होतील अशी शंका उपस्थित केली जातीये. हे भविष्य असलं तरी वर्तमानात देखील नदीकाठच्या दुर्गंधी मुळे हवा तो आनंद मिळू शकत नाही. धर्म सांगतो म्हणून नदीची आरती करता येते पण त्या आरती मागची शिकवण विसरून जागीच निर्माल्य वाहिले जाते. आरतीने काहीच होत नसले तरी केर क़चर्याने नदी प्रदूषित होते आणि पर्यायाने तिचं पाणी पिउन सजीव धोका पत्करत आहेत, हे सुद्धा प्रगतीची कास धरणारा माणूस समजू शकत नसेल तर यापेक्षा दूसरी अधोगती नसावी.
पर्याय म्हणून सेंद्रिय व्यवस्था, सौर ऊर्जा यांचा
उपाय सांगितला जातो. हळूवार, खर्चिक अशा या गोष्टी असल्या तरी असाध्य नाही आहेत. शक्य तिथे यांचा वापर व्हावयास हवा. सौर ऊर्जे वर आधारित विमान या संकल्पनेचे जनक बट्रांड पिकार्ड यांनी अपारंपरिक ऊर्जेला प्रोत्साहन दिल्यास जागतिक पर्यावरणाचा प्रश्न सुटण्यास मदत होईल असे म्हटले होते. ‘सोलर इम्पल्स 2’ हे विमान चालविणारे वैमानिक बोशबर्ग या वैमानिकाने देखील सौर क्षेत्रात जनजागृती व्हावी ह्या उद्देशाने सौर विमानाच्या सहाय्याने जग भ्रमन्तिचं पाऊल उचलल्याचं म्हटलं आहे. कारण, जेवढा जीवाश्म इंधनांचा वापर जास्त, तेवढं कार्बन डायऑक्साइड चं उत्सर्जन जास्त.. यामुळे ग्लोबल वॉर्मिंग ची समस्या वाढीस लागून, हवामान बदल, अतिदुष्काळ जन्य परिस्थिती उद्यास आली आहे. तिसरे विश्व महायुद्ध पाण्यामुळे नाही झाले म्हणजे मिळवले, अशी जगाची सद्य स्थिती आहे. वर्षाला शंभर कुटूुंबं वापरतील एवढं पाणी पंच तारांकित हॉटेल्स मध्ये 180 लोकं 55 दिवसांत वापरतात. ह्या सर्वाचा विचार केला तर शेतकरयावर किंवा इतर काही दुष्काळी भागातील माणसांवर त्यांचीच बांधवं अन्याय करतात असे दिसते.
आंतरराष्ट्रीय शिखरे म्हणजे शोभेच्या बाहुल्या आहेत. त्यातही ‘ट्रम्प विचार’ हे सर्व थोतांड आहे असं म्हणत पॅरिस करारातून बाहेर पडतात, म्हणजे पूर्वी सुधारणा नव्हती आणि आता चुकीची जाणीवही नाही. माणसं, पर्यावरण असं सर्वांचंच शोषण करणाऱ्या भांडवलशाही कडून आणखी अपेक्षा ती काय करणार? या सर्वांतून धड़ा घेऊन मिश्र व्यवस्था स्वीकरणाऱ्या भारताने तरी आपले योगदान द्यावे, शेवटी भारताला ‘गांधी विचार’ लाभले आहेत, हे विसरून चालणार नाही. संपूर्ण जगात एक माणूस, प्रति वर्षी दिड टन कार्बन उत्सर्जना साठी कारणीभूत असतो. यात आघाडीवर चीन-28%, अमेरिका-14%, यूरोपियन महासंघ- 10%, आणि भारत-7% आहे. 2014 मध्ये 9.9 अब्ज टन इतके कार्बन उत्सर्जन झाले होते, ते 2013 पेक्षा 2.5 टक्के अधिक होते. क्योटो करारा नुसार हे प्रमाण 1990 पेक्षा 61 टक्क्यांनी अधिक आहे. भारतात 2022 पर्यन्त सौर व्यवस्थेचे ध्येय आहे, त्याला कृतीची जोड़ मिळाली तर पर्यावरणाचे संवर्धन शक्य होईल. भारतात गुजरात ला ‘सोलर सिटी’ करण्याचे आश्वासन राज्य कर्त्यांनी दिले आहे. ह्याच राज्यकर्त्यांनी समुद्रावर अन्याय करत महापुरुषांचे पुतळे उभारण्याचे देखील आश्वासन दिले आहे. आपल्या उक्ती आणि कृतींमध्ये समन्वय राखायला ही व्यवस्था कधी शिकणार कोणास ठाऊक?
रसायनांचा घातक मारा पावसावर निर्बंध आणतोय, ह्या छोट्या पण मोठा परिणाम करणाऱ्या गोष्टींकडे आता आपण लक्ष दिले पाहिजे. प्लास्टिक वाचून काही गोष्टी आडत असतील तर 50 मैक्रॉन च्या वरील प्लास्टिक चा वापर असं नियमाला धरून वागू शकतो पण नियंत्रण ही गोष्ट जणू अशक्य आहे असं हल्ली आपण दाखवून देतो आणि मग थेट बंदी कड़े वळतो. अनेक प्रकारच्या प्रदूषणांपैकी ध्वनी प्रदूषणाकड़े सातत्याने दुर्लक्ष केले जाते. पण ती एक गंभीर बाब आहे. भोंगे असो वा डीजे प्रश्न भावनांचा नाही कानांचा आहे. आणि ते सर्वच धर्मियांना असतात, हे सांगण्याची बालिश वेळ येण्या इतपत माणूस वागतोय. दोन महिन्यांपूर्वी, आर्क्टिक ध्रुवावर, संपत आलेल्या बर्फा वर बसून समुद्राकडे पोलार बीअर पाहत असल्याचा फ़ोटो इंस्टाग्राम वर पाहिला होता. काही वर्षांपूर्वी बर्फ नसलेल्या आर्क्टिकची भीती शास्त्रज्ञांनी बोलून दाखवली होती, तिचं भयानक रूप पोलार बिअर्स च्या डोळ्यांत दिसून येतं. आपल्या चुकांमुळे ह्या जिवांनी कुठे जायचं? माणूस काहीही करेल पण हे जीव कुठून आणणार स्वतः साठी बर्फ?
इ वेस्ट ही एक समस्या पर्यावरणा पुढे आहे. तिचे वेळीच व्यवस्थापन व्हायला हवे.
शेवटी, पृथ्वी, नदया, समुद्र, डोंगर, दरया हे फक्त साहित्याचा भाग म्हणून वापरायचे की येणाऱ्या पिढीला चांगल्या स्वरुपात दाखवायचे? हे आजच मनाशी ठरवूया.. आणि आपल्याला सुख देणाऱ्या पर्यावरणाला आपणही सुख देऊया.

Read more...

नोकरी, शिक्षण आणि बाजार…

नोकरी, शिक्षण आणि बाजार…

सजग संपादकीय

 

प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.
फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता?

प्रगती, विकास ह्याचा विचार करावसं हल्ली कोणत्याच क्षेत्रातल्या प्रतिनिधींना वाटत नाहीये.
फक्त सगळ्यात जास्त तरुणांचा देश असं ओरडत सांगून कोणी महासत्ता होणार नसतं. आणि का व्हायचयं महासत्ता?

आपल्या लोकांना दोन वेळेच अन्न मिळून, त्यांच्या मुलभूत गरजा भागून सुखाने आयुष्य काढता यावे या सारखी ईतर कुठली सत्ता नसावी पण पैसा आणि त्या साठीची शर्यत यापुढे कोणालाच काही दिसत नाहीये. खुप मोठ्या मनुष्य बळाची आणि तांत्रिकतेची गरज आहे म्हणून लाखो engineers व्यवस्था निर्माण करतेय पण कंपन्याना काय हवयं याचा विचार न करता नुसतचं शिक्षणाचे धड़े गिरवले जातायेत. शिक्षणाच्या बाजारात लाखो विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. भरमसाठ फी आणि ईतर खर्चाने कावेबाजांचा व्यापार तर होतोय पण विदयार्थ्यांच्या भविष्याचं काय?

असं कोणतं शिक्षण पुरवलं जातय ज्या मुळे तुमच्या criteria मध्ये मुलं/मुली बसत नाहिये?
पदवीनंतर नोकरी मिळवून देऊ हा एक नवीन बाजार सुरु झालाय.

कोणतही शिक्षण घ्या, बाहेर बाजारबुणगे आहेच त्यांचंच किती प्रभावी शस्त्र आहे याची जाहिरात करायला. शिक्षणपद्धती कडून समाधान होत नसल्याने पालक आणि विद्यार्थी सुद्धा बाजारात नुकसान करून घेणारं गिऱ्हाईक बनत आहेत.

मिळत असलेलं शिक्षण आणि त्या पुढील टप्प्या वरची कामे यामधील अंतर खुप आहे. असं असून सुद्धा कोणत्या सचोटी वर तपासून कामास पात्र असं ठरवलं जात आहे हे काही कळेना.

विद्यार्थ्यांना सुद्धा कशालाच बळी न पड़ता खुप मोठ्या कसोटीवर उतरून हार न मानता लढत रहावे लागेल.

तेजल देवरे. – युवा लेखिका, नाशिक

Read more...