६ ऑगस्टपासून राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, खा.अमोल कोल्हेंंकडे धुरा

शिवजन्मभूमी जुन्नर येथून यात्रेला होणार सुरूवात

सजग वेब टिम, महाराष्ट्र
मुंबई | राज्याच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल थोड्याच दिवसात वाजणार आहे. त्यातच नेत्यांच्या बैठका आणि जनसंपर्क वाढवण्यावर सर्वच पक्षांनी भर देण्यास सुरूवात केली आहे. गुरूवारपासून भाजपच्या महाजनादेश यात्रेला सुरूवात होणार आहे. तर शिवसनेतर्फे आदित्य ठाकरे यांनी जनआशीर्वाद यात्रेला सुरूवात केली आहे. याच पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे शिवस्वराज्य यात्रेचे आयोजन केले आहे. खा. डॉ. अमोल कोल्हे यांच्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली असून खा. उदनराजे भोसले हेदेखील स्टार प्रचारक म्हणून या यात्रेत सहभागी होणार आहेत.

६ ऑगस्टपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिवस्वराज्य यात्रेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक दिवशी ३ मतदारसंघांमध्ये ही यात्रा जाणार असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीपासून म्हणजेच जुन्नर येथून या सभेला सुरूवात होणार आहे. पहिल्या टप्प्याची सांगता जिजाऊंच्या जन्मस्थानी म्हणजेच सिंदखेडराजा या ठिकाणी होणार आहे.

या यात्रेचा दुसरा टप्पा १६ ऑगस्ट पासून तुळजापूर येथून होणार आहे. तर सांगता रायगडावर होणार आहे. या यात्रेची सर्व जबाबदारी युवक राष्ट्रवादी काँग्रेसकडे सोपवण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या खांद्यावर या यात्रेची प्रमुख जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

Read more...

खासदार डॉ. अमोल कोल्हे शिवरत्न पुरस्काराने सन्मानित

मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा – खा.अमोल कोल्हे

नवी दिल्ली | प्रसिध्द मानवतावादी संगठन मराठा सेवा संघाच्या वतीने नवनिर्वाचित लोकसभा सदस्य तथा मराठा विश्वभूषण पुरस्कार सम्मानित डॉ.अमोल कोल्हे यांना आज येथे शिवरत्न पुरस्काराने गौरवाविण्यात आले. आयोजन नवीन महाराष्ट्र सदनातील ऐसपैस मोकळ्या प्रांगणात संपन्न झाले. मराठा सेवा संघाचे राष्ट्रीय महासचिव कमलेश पाटील यांच्याहस्ते आज डॉ.अमोल कोल्हे यांना शिवरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आला. या आनंदी सोहळ्यात दिल्लीवासियांसह संभाजी बिग्रेडचे दिल्ली प्रभारी प्रो.पंकज कणसे, संभाजी ब्रिगेडचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष, प्रा. परमेश्वर गपट, जिजाऊ ब्रिगेडचे दिल्ली अध्यक्षा प्रा.संजीवनी पिंगळे, विधीकक्षाचे अध्यक्ष अॅड. सुहास कदम, अॅड. आकाश काकडे, अॅड. प्रकाश कहार यांची उपस्थिती लाभली.

कमलेश पाटील यांनी या सोहळ्याविषयी स्पष्ट केले की, डॉ. अमोल कोल्हे यांनी अनेक कसोट्यांमधून त्रास सहन करीत छत्रपती शिवराय महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा खरा इतिहास भारतीयांच्या मनामनात घराघरात पोहचविण्याचे गौरवशाली कार्य पाइले आहे. ज्यांच्या रक्तात गौरवशाली इतिहासाचे विचार रुजलेले असतात तेच तळमळीने सृजनशील कार्यात गुंतवून घेतात व राष्ट्रकार्यात योगदान देतात.त्यापैकी डॉ. अमोलराजे एक आदर्श उदाहरण आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी ठरत आहे. राष्ट्रपितामह तात्याबा ज्योतिबा फुले यांनी सुरु केलेले शिवकार्य आज डॉ. अमोलराजे पुढे नेत आहेत. “रायगड वंदन” हे “फुले ते कोल्हे” या प्रवासाचा मोठा स्वतंत्र इतिहास ठरणार आहे. या महान विभूतिंची उपकार फेड भारतीय समाज कधी करु शकणार नाही.

या कार्यक्रमास प्रा.रुषिकेश पवार, प्रा.राम पवार, प्रा.गोपाल मोरे, प्रा.उमेश शिंदे, प्रा. हनुमंत कदम, प्रा. रोहित गायकवाड, प्रा. अजिंक्य पाटील, प्रा. गोवर्धन भुतेकर, राहूल मराठा, प्रा. उमेश कोर्राम, रामकुमार जाधौन, प्रा. उमेश सूर्यवंशी, आकाश सौबळे अजीतेश मांडौले, अक्षय दुशिंग, इंस्पेक्टर संतोष सांबरे, इंस्पेक्टर संजय शिंगाई, इंस्नपेक्टर हितेंद्र देसले, इंस्पेक्टर गोविंद पिंगले, इंस्पेक्टर गोकुल आघाव, इंस्पेक्टर पंकज तायडे, मेजर डी. नरवडे, इंजिनियर प्रभाकर शिंदे, प्रा. कुमारी काटे, समाजसेवक श्री. प्रसाद खामकर, विशाल भुजबळ, रंजीत कदम, प्रा. मंगेश वानखेडे, विधीज्ञ निखिल अडकिने.

आभार व्यक्त करताना डॉ. अमोल राजे म्हणाले की, मी शिवकार्यातला एक लहानसा मावळा आहे. माझ्यापरीने भारतीयता विकसित करण्यासाठी जे जे शिवमय उदात्त मंगलमय सृजनशील आहे जे भारतीयांसमोर मांडताना मला स्वत:ला धन्यता लाभते. आणि यासाठी भारतीयांना देण्यासाठी जर काही आज उपलब्ध असेल
तर तो फक्त नि फक्त छत्रपती शिवशंभू महाराजांचा व त्यांची गुरुमाता राष्ट्रमाता जिजाऊंचा प्रेरणादायी इतिहासच एक मात्र गगनभर भंडारा आहे. आणि तो मी माझ्यापरीने मांडण्याचा प्रयत्न करतो आहे. हे करताना खासदार म्हणून लोकसेवकाचे माझे कर्तव्यातही मी गुंतवून घेतले आहे.
कार्यक्रमास वेळातवेळ काढून आलेल्यांचे आभार प्रा. पंकज कणसे यांनी मानले.

Read more...

प्राधान्याच्या कामांसाठी जिल्हा परिषदेला तातडीने निधी उपलब्ध करून देणार – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सजग वेब टिम, पुणे

पुणे| जिल्ह्यासाठी तातडीने आणि प्राधान्याने आवश्यक असणाऱ्या कामांची यादी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांनी एकत्रितपणे तयार करुन तसा प्रस्ताव तातडीने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पाठविण्याच्या सूचना देत अशा प्राधान्याच्या कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात येईल, अशी ग्वाही महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज दिली.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज पुणे जिल्हा परिषदेला भेट दिली. जिल्हा परिषदेच्या सभागृहात त्यांनी जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि अधिकारी यांच्याशी संवाद साधला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्वासराव देवकाते-पाटील, उपाध्यक्ष विवेक वळसे-पाटील, जिल्हाधिकारी नवल किशोर राम, स्थायी समितीचे सदस्य शरद बुट्टे-पाटील, सदस्य नितीन मराठे, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी नृसिंह मित्रगोत्री यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते.
पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पुणे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा व रस्त्यांच्या दुरूस्तीसाठी आवश्यक असणाऱ्या निधीची मागणी तातडीने नोंदवावी, या मागणीचा प्राधान्याने विचार करून जिल्हा वार्षिक योजनेतून आवश्यक असणारा निधी देण्यात येईल. तसेच जिल्ह्यात सध्या तातडीच्या आणि प्राधान्याच्या कामाची यादी व प्रस्ताव पदाधिकारी आणि अधिकाऱ्यांनी एकत्रित बसून तयार करावा, तो तातडीने जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्फत पाठवून द्यावा, या कामांसाठी आवश्यक निधीची उपलब्धता करून देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी राज्य शासनाकडे असणारी मुद्रांक शुल्क बाकी, टंचाई आराखडा, जिल्ह्यात सुरू असणारे पाण्याचे टँकर, मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत सुरु असणाऱ्या जिल्ह्यातील 12 कामांच्या प्रगतीचा आढावा, पालखी सोहळ्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या उपाययोजना, 33 कोटी वृक्ष लागवड कार्यक्रम, स्वच्छ भारत मिशन,महाराष्ट्र ग्राम परिवर्तन अभियान कार्यक्रम आदी कामांचा आढावा पालकमंत्री यांनी घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी प्रभाकर गावडे यांनी सादरीकरण केले. यावेळी विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

Read more...

दिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा पंतप्रधानांनी केलं कौतुक

दिल्लीत अमोल कोल्हेंच्या नावाची चर्चा, पहिल्या भाषणावर मोदी म्हणाले…
अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, शेतकरी आत्महत्या, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाष्य करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं.

सजग वेब टिम
नवी दिल्ली | शिरूर लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी संसदेत केलेल्या भाषणाची सध्या जोरदार चर्चा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अमोल कोल्हे यांच्या भाषणाचं कौतुक केल्याचं पाहायला मिळालं.

शिरुर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून गेलेल्या अमोल कोल्हे यांनी संसदेत शेती, बैलगाडा शर्यत, गडकिल्ले अशा अनेक विषयांबाबत भाषण करत सरकारचं लक्ष वेधून घेतलं. यावेळी त्यांनी केलेली विषयांची अचूक मांडणी आणि वक्तृत्वशैली यामुळे कोल्हे यांचं कौतुक झालं. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभ्यासपूर्ण भाषण केल्याबद्दल काही मोजक्या खासदारांचा उल्लेख केला. त्यात अमोल कोल्हे यांच्याही नावाचा समावेश होता.

Read more...

पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार हवेत – शरद पवार

पिंपरी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भोसरी एमआयडीसी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. लोकसभेच्या निकालामुळे खचून न जाता विधानसभेच्या तयारीला लागा आणि पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदाससंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच आमदार निवडून आले पाहिजेत, असे आवाहन खा. शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

विधानसभा निवडणुकीला केवळ ९८ दिवस राहिले आहेत. जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आतापासूनच मतदारांशी संवाद साधा आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा. जेणेकरून मतदार ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न उपस्थित करणार नाही. असे केल्याने विधानसभा निवडणुकीत यश येणे अशक्य नाही, असा मार्गदर्शनपर सल्लाही पवार यांनी दिला.

Read more...

आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळेल – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर  | “आंबेगाव तालुक्याचा शाश्वत विकास करणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मागे जनता ठामपणे उभी आहे. तालुक्याचा उमेदवार असूनही मला आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून जनतेने मताधिक्‍य दिले. याचा राग मनात धरून, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा विधानसभेला आंबेगावमध्ये वचपा काढू, अशी गर्वाची भाषा विरोधकांकडून वापरली जात आहे.

पण, मी आताच लिहून देतो, की या पूर्वी झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांपेक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळवून देण्याचे काम येथील सुज्ञ जनता करणार आहे, असा विश्वास नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर झालेल्या आभार सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, उषा कानडे, संतोष भोर, सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, “येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन बाह्यवळणाची कामे मार्गी लावण्यासाठी चर्चा केली जाईल. वाहतूक कोंडीचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्‍यात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेचे नियोजन कळविण्याची व्यवस्था केली जाईल.”

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “गेली १५ वर्षे विकासकामे करण्याऐवजी पायात पाय अडकविण्याचे व निंदानालस्ती करण्याचे काम विरोधकांनी केले. तुम्हाला काय वचपा काढायचा तो काढा. माझा विश्वास जनतेवर आहे. भीमाशंकर व पराग कारखान्यांनी पुढाकार घेऊन टाकळी हाजी, पाबळ व लोणी धामणी परिसरांत गुरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.”

अवसरी खुर्द राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थांनी दहा टन हिरवा चारा गुरांच्या छावण्यासाठी दिल्याबद्दल ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. अरुणा थोरात, सुषमा शिंदे, सचिन पानसरे, संजय वायाळ, कल्याण टेमकर, योगेश वायाळ, अंकुश लोंढे पाटील, नीलेश टेमकर यांची या वेळी भाषणे झाली. जगदीश अभंग यांनी सूत्रसंचालन केले.

Read more...

भिमाशंकरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच संसदेत सादर करणार – खा.डॉ अमोल कोल्हे

भक्तीशक्ती करिडॉर अंतर्गत भिमाशंकरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच संसदेत सादर होणार – खा.डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर | आज दि २ जून रोजी भीमाशंकर तीर्थक्षेत्रास भेट देऊन खासदार बीत प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी वर्गा सोबत बैठक घेतली तसेच भीमा नदीच्या उगमस्थानाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आज पाहणी केली व लवकरात लवकर याचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना अधिकारी वर्गास केल्या व येत्या अधिवेशनात भक्तीशकती करिडॉर विकास आराखडा सादर केला जाईल असे प्रतिपादन खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केले
यावेळी दिलीपराव वळसे पाटील, खा.अमोल कोल्हे , विष्णुकाका हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते

आज दि २ जून रोजी भीमाशंकर तीर्थक्षेत्रास भेट देऊन खासदार अमोल कोल्हे यांनी प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली. तसेच भीमा नदीच्या उगमस्थानाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आज पाहणी केली. लवकरात लवकर याचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना अधिकारी वर्गास दिल्या व येत्या अधिवेशनात भक्ती शक्ती कॉरिडॉर अंतर्गत विकास आराखडा सादर केला जाईल असे प्रतिपादन खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी आंबेगाव चे आमदार दिलीपराव वळसे पाटील, खा अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णुकाका हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read more...

खेड तालुक्यातून अमोल कोल्हेंना ३० हजाराचे लिड : दिलीप मोहिते पाटील

 

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना खेड तालुक्यातून ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. महिला, तरुण, माळी समाज आणि इतर मागासवर्गीयांची बहुतांश मते राष्ट्रवादीला मिळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.

आम्ही तालुक्याच्या गावागावात प्रचार केला, शंभर ते सव्वाशे कोपरसभा आणि नऊ-दहा मोठ्या सभा घेतल्या. सर्वठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधी लोकांच्या सभांना गर्दी होत नव्हती. त्यांची उद्धव ठाकरेंची सभाही फ्लॉप झाली. पंतप्रधान मोदींची हवाही कुठे दिसली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांना तालुक्यात सभाही घेता आली नाही. शेवटच्या दिवशी राजगुरूनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या रॅलीला दोनशे लोकही नव्हते. याउलट त्याच दिवशी डॉ. कोल्हेंच्या रॅलीला प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र डॉ. कोल्हे यांना सर्वठिकाणी उदंड प्रतिसाद मिळणारा यावरून तालुक्यात त्यांना ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मला वाटतो, असे मोहिते म्हणाले.

आम्ही नेत्यांनी गावागावात प्रचार केला, मात्र गावातील कार्यकर्त्यांना गावातच ठाण मंडून बसण्यास सांगितले होते. आम्ही गावात गेल्यावर खासदारांनी तुमच्या गावात काय काम केले ? आणि खासदार कधी तुमच्या गावात आले होते का ? एवढे दोन प्रश्न आवर्जून विचारायचो. त्यांची उत्तरे बहुतांशवेळा नकारार्थी यायची. त्यावर मग त्यांना मत कशासाठी द्यायचे असा प्रश्न विचारल्यावर लोकांच्या लक्षात वस्तुस्थिती यायची आम्हाला सकारात्मक वातावरण तयार व्हायचे. याउलट नोटबंदी, जीएसटी, बैलगाडा शर्यती आणि खोट्या आश्वासनांमुळे विरोधी बाजूंवर लोकांचा राग दिसत होता. शिवसेना आणि भाजपचे लोक एकमेकांबरोबर प्रचंड भांडत होते आणि त्यानंतर अचानक गळ्यात गळे घालू लागले हेही लोकांना पटले नाही, त्यामुळे तालुक्यात आम्हाला मताधिक्य निश्चित असल्याचे असेही मोहिते यांनी सांगितले.

Read more...

दुष्काळ निवारण उपाययोजनांकरिता जिल्हा प्रशासन सज्ज

सजग वेब टिम, पुणे

जुन्नर | पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरिता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी येणाऱ्या तक्रारींकरिता स्वतंत्रपणे नोंद घेण्यात येऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये टॅंकरची मागणी आल्यास 24 तासात मंजुरी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 6 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चारा छावण्यांच्या नवीन प्रस्तावांना 24 तासांतच मंजुरी देण्यात येऊन त्याची कार्यवाही करण्यात येत आहे. चाऱ्याच्या उपलब्धेकरिता मे 2019 पर्यंत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभागाकडील चारा पिकाखाली, पशुसंवर्धन विभागाकडील कामधेनु दत्तक ग्राम योजना, वैरण विकास योजना, जिल्हा परिषद सेस अंतर्गत, उसाच्या वाढ्यांपासून, आत्मा आणि टीएससी/केव्हीके, जलाशय, तलावाखालील गाळपेरापासून, कृषि विभागाकडून उन्हाळी हंगाम अशा एकूण दोन लाख हेक्‍टर क्षेत्रापासून एकूण 14 लाख टन तर उसापासून उपलब्ध होणारा चारा (व्होल) 13 लाख टन अशा एकूण 27 लाख टन चाऱ्याचे नियोजन मे 2019 अखेर करण्यात आलेले आहे. याकरिता पुरेसा निधी उपलब्ध झालेला आहे.दुष्काळ निवारण, टॅंकर मागणी, चारा छावणी तसेच आपत्ती व्यवस्थापन इ. विषयांकरीता नागरिकांनी त्यांच्या तक्रार किंवा सूचनांकरिता 1077 या टोल फ्री व 020- 26123371 या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.

Read more...

शिक्षण व सहकार क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व जनार्दन(मास्तर) बांगर कालवश

सजग वेब टीम, जुन्नर
बेल्हे| मुंबई एज्युकेशन बोर्डाचे माजी उपायुक्त आणि विशाल जुन्नर नागरी पतसंस्थेचे संस्थापक जनार्दन रभाजी बांगर उर्फ जना मास्तर यांचे अल्पशा आजाराने मुंबई  येथे राहत्या घरी देहावसान झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सहा मुली,सून,जावई,नातवंडे आणि भाऊ असा मोठा परिवार  आहे बेल्हे (गुंळूचवाडी) शिवारात शेतकरी कुटुंबात जन्मलेले जनार्दन रभाजी बांगर हे मुबंई एज्युकेशन बोर्डाचे उपयुक्त असताना राज्यातील अनेक शिक्षण संस्थेच्या संचालकाना मार्गदर्शन करून संस्था जगविल्या असल्याचे बोलले जाते.मुबंई येथे नोकरी-व्यवसायांच्या निमित्ताने आलेल्या बेल्हे परिसरातील व्यक्तींना एकत्र करून बेचाळीस वर्षांपूर्वी दिन दुबळ्या घटकांना उभे करण्यासाठी भायखळा येथे,विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.त्यानंतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी त्यांनी विशाल जुन्नर सेवा मंडळा ची स्थापना करून आळे येथे सर्वप्रथम औषध निर्माण महाविद्यालय सुरु केले.परिसरात शिक्षण व सहकार क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते,आज सकाळी मुंबई येथे राहत्या घरी त्यांचे देहावसान झाले,सायंकाळी बेल्हे येथील गंगाद्वार स्मशानभूमीत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यात आले.
Read more...