पिंपरी, चिंचवड, भोसरी मतदारसंघात राष्ट्रवादीचेच आमदार हवेत – शरद पवार

पिंपरी | आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांनी भोसरी एमआयडीसी येथे पदाधिकाऱ्यांची बैठक आयोजित केली होती. लोकसभेच्या निकालामुळे खचून न जाता विधानसभेच्या तयारीला लागा आणि पिंपरी, चिंचवड आणि भोसरी या तीनही मतदाससंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच आमदार निवडून आले पाहिजेत, असे आवाहन खा. शरद पवार यांनी पदाधिकाऱ्यांना केले.

विधानसभा निवडणुकीला केवळ ९८ दिवस राहिले आहेत. जास्तीत जास्त तरुण चेहऱ्यांना संधी देण्यासाठी आतापासूनच मतदारांशी संवाद साधा आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठवा. जेणेकरून मतदार ऐनवेळी आठवण काढली का? असा प्रश्न उपस्थित करणार नाही. असे केल्याने विधानसभा निवडणुकीत यश येणे अशक्य नाही, असा मार्गदर्शनपर सल्लाही पवार यांनी दिला.

Read more...

आगामी विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळेल – खा. अमोल कोल्हे

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर  | “आंबेगाव तालुक्याचा शाश्वत विकास करणारे विधानसभेचे माजी अध्यक्ष दिलीप वळसे पाटील यांच्या मागे जनता ठामपणे उभी आहे. तालुक्याचा उमेदवार असूनही मला आंबेगाव विधानसभा मतदारसंघातून जनतेने मताधिक्‍य दिले. याचा राग मनात धरून, लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाचा विधानसभेला आंबेगावमध्ये वचपा काढू, अशी गर्वाची भाषा विरोधकांकडून वापरली जात आहे.

पण, मी आताच लिहून देतो, की या पूर्वी झालेल्या सर्व विधानसभा निवडणुकांपेक्षा येत्या विधानसभा निवडणुकीत वळसे पाटील यांना विक्रमी मताधिक्‍य मिळवून देण्याचे काम येथील सुज्ञ जनता करणार आहे, असा विश्वास नवनिर्वाचित खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी व्यक्त केला.

अवसरी खुर्द (ता. आंबेगाव) येथे श्री काळभैरवनाथ मंदिरात दर्शन घेतल्यानंतर झालेल्या आभार सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. या वेळी दिलीप वळसे पाटील, देवेंद्र शहा, देवदत्त निकम, सुभाष मोरमारे, उषा कानडे, संतोष भोर, सरपंच संगीता शिंदे, उपसरपंच राजेंद्र शिंदे आदी उपस्थित होते.

डॉ. कोल्हे म्हणाले, “येत्या आठवड्यात अधिकाऱ्यांबरोबर बैठका घेऊन शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांना योग्य मोबदला देऊन बाह्यवळणाची कामे मार्गी लावण्यासाठी चर्चा केली जाईल. वाहतूक कोंडीचा प्रश्नही सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. प्रत्येक तालुक्‍यात जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी दिल्या जाणाऱ्या वेळेचे नियोजन कळविण्याची व्यवस्था केली जाईल.”

दिलीप वळसे पाटील म्हणाले, “गेली १५ वर्षे विकासकामे करण्याऐवजी पायात पाय अडकविण्याचे व निंदानालस्ती करण्याचे काम विरोधकांनी केले. तुम्हाला काय वचपा काढायचा तो काढा. माझा विश्वास जनतेवर आहे. भीमाशंकर व पराग कारखान्यांनी पुढाकार घेऊन टाकळी हाजी, पाबळ व लोणी धामणी परिसरांत गुरांच्या छावण्या सुरू करण्याचे नियोजन केले आहे.”

अवसरी खुर्द राष्ट्रवादी कॉंग्रेस व ग्रामस्थांनी दहा टन हिरवा चारा गुरांच्या छावण्यासाठी दिल्याबद्दल ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. अरुणा थोरात, सुषमा शिंदे, सचिन पानसरे, संजय वायाळ, कल्याण टेमकर, योगेश वायाळ, अंकुश लोंढे पाटील, नीलेश टेमकर यांची या वेळी भाषणे झाली. जगदीश अभंग यांनी सूत्रसंचालन केले.

Read more...

भिमाशंकरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच संसदेत सादर करणार – खा.डॉ अमोल कोल्हे

भक्तीशक्ती करिडॉर अंतर्गत भिमाशंकरचा तीर्थक्षेत्र विकास आराखडा लवकरच संसदेत सादर होणार – खा.डॉ अमोल कोल्हे

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर | आज दि २ जून रोजी भीमाशंकर तीर्थक्षेत्रास भेट देऊन खासदार बीत प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी वर्गा सोबत बैठक घेतली तसेच भीमा नदीच्या उगमस्थानाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आज पाहणी केली व लवकरात लवकर याचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना अधिकारी वर्गास केल्या व येत्या अधिवेशनात भक्तीशकती करिडॉर विकास आराखडा सादर केला जाईल असे प्रतिपादन खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केले
यावेळी दिलीपराव वळसे पाटील, खा.अमोल कोल्हे , विष्णुकाका हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते

आज दि २ जून रोजी भीमाशंकर तीर्थक्षेत्रास भेट देऊन खासदार अमोल कोल्हे यांनी प्रलंबीत प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारी वर्गासोबत बैठक घेतली. तसेच भीमा नदीच्या उगमस्थानाचा पर्यटन स्थळ म्हणून विकास करण्यासाठी आज पाहणी केली. लवकरात लवकर याचा विकास आराखडा तयार करण्याची सूचना अधिकारी वर्गास दिल्या व येत्या अधिवेशनात भक्ती शक्ती कॉरिडॉर अंतर्गत विकास आराखडा सादर केला जाईल असे प्रतिपादन खा.डॉ अमोल कोल्हे यांनी केले.

यावेळी आंबेगाव चे आमदार दिलीपराव वळसे पाटील, खा अमोल कोल्हे, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष विष्णुकाका हिंगे व ग्रामस्थ उपस्थित होते.

Read more...

विनापरवाना बैलगाडा शर्यत भरवल्या प्रकरणी ७ जणांवर गुन्हा दाखल

सजग वेब टिम, आंंबेगाव (प्रमोद दांगट)

गावडेवाडी | येथे बैलगाडा शर्यतीवर न्यायालयाची बंदी असतानाही विनापरवाना बैलगाडा शर्यतीचे आयोजन केल्याप्रकरणी ७ जणांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विजय विलास कराळे वय ३३,गौरव रामदास गावडे वय ३१,सचिन बबन गावडे वय २९,कैलास भगवन्त गावडे ४०,देवराम बाळकृष्ण गावडे वय ५०,भास्कर बाबासाहेब जगताप वय ४०,संदीप भाऊसाहेब गावडे सर्व रा गावडेवाडी ता आंबेगाव अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे आहेत.

मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार राजेंद्र हिले यांनी याबाबत फिर्याद दिली आहे
गावडेवाडी येथे शनिवारी (दि १८ रोजी) सकाळी ८.४५ वाजता गावडेवाडी येथील बैलगाडा घाटात विनापरवाना काही लोकांनी बैलगाडा शर्तीचे आयोजन केल्याची माहिती मंचर पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे, बिटजमादार सुनील शिंदे,राजेंद्र हिले,पोलीस शिपाई योगेश रोडे ,रमेश करंडे याना माहिती मिळाली असता पोलीस उपनिरीक्षक सोमनाथ पांचाळ,पोलीस नाईक राजेंद्र हिले यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन तेथील लोकांना न्यायालयाच्या निर्देशानुसार बैलगाडा शर्यतीस बंदी असल्याचे सांगितले,तसेच नियमाचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कार्यवाई करण्याचा इशारा दिला तरी देखील काहींनी बैलगाडा शर्यत चालू ठेवली ,त्यामुळे पोलिसांनी बैलगाडा शर्यतीचे आयोजक व बैलगाडा मालक अश्या ७ जणांवर गुन्हा दाखल केला आहे पोलीस जमादार सुनील शिंदे पुढील तपास करत आहे. मा. न्यायालयाच्या आदेशानुसार बैलगाडा शर्यती वर बंदी असून कुठेही बैलगाडे पळवणे हा कायद्याने गुन्हा आहे.त्यामुळे कुणीही बैलगाडे पळवून कायदा हातात घेऊ नहे असे आवाहन पोलीस निरीक्षक कृष्णदेव खराडे यांनी केले आहे.

Read more...

खेड तालुक्यातून अमोल कोल्हेंना ३० हजाराचे लिड : दिलीप मोहिते पाटील

 

सजग वेब टीम, राजगुरूनगर

राजगुरूनगर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांना खेड तालुक्यातून ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा दावा खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी केला आहे. महिला, तरुण, माळी समाज आणि इतर मागासवर्गीयांची बहुतांश मते राष्ट्रवादीला मिळतील असा विश्वास त्यांनी बोलून दाखविला आहे.

आम्ही तालुक्याच्या गावागावात प्रचार केला, शंभर ते सव्वाशे कोपरसभा आणि नऊ-दहा मोठ्या सभा घेतल्या. सर्वठिकाणी आम्हाला उत्तम प्रतिसाद मिळाला. याउलट विरोधी लोकांच्या सभांना गर्दी होत नव्हती. त्यांची उद्धव ठाकरेंची सभाही फ्लॉप झाली. पंतप्रधान मोदींची हवाही कुठे दिसली नाही. प्रचाराच्या शेवटच्या दिवशी त्यांना तालुक्यात सभाही घेता आली नाही. शेवटच्या दिवशी राजगुरूनगरमध्ये झालेल्या शिवसेनेच्या रॅलीला दोनशे लोकही नव्हते. याउलट त्याच दिवशी डॉ. कोल्हेंच्या रॅलीला प्रचंड गर्दी उसळली होती. मात्र डॉ. कोल्हे यांना सर्वठिकाणी उदंड प्रतिसाद मिळणारा यावरून तालुक्यात त्यांना ३० ते ४० हजारांचे मताधिक्य मिळेल, असा विश्वास मला वाटतो, असे मोहिते म्हणाले.

आम्ही नेत्यांनी गावागावात प्रचार केला, मात्र गावातील कार्यकर्त्यांना गावातच ठाण मंडून बसण्यास सांगितले होते. आम्ही गावात गेल्यावर खासदारांनी तुमच्या गावात काय काम केले ? आणि खासदार कधी तुमच्या गावात आले होते का ? एवढे दोन प्रश्न आवर्जून विचारायचो. त्यांची उत्तरे बहुतांशवेळा नकारार्थी यायची. त्यावर मग त्यांना मत कशासाठी द्यायचे असा प्रश्न विचारल्यावर लोकांच्या लक्षात वस्तुस्थिती यायची आम्हाला सकारात्मक वातावरण तयार व्हायचे. याउलट नोटबंदी, जीएसटी, बैलगाडा शर्यती आणि खोट्या आश्वासनांमुळे विरोधी बाजूंवर लोकांचा राग दिसत होता. शिवसेना आणि भाजपचे लोक एकमेकांबरोबर प्रचंड भांडत होते आणि त्यानंतर अचानक गळ्यात गळे घालू लागले हेही लोकांना पटले नाही, त्यामुळे तालुक्यात आम्हाला मताधिक्य निश्चित असल्याचे असेही मोहिते यांनी सांगितले.

Read more...

दुष्काळ निवारण उपाययोजनांकरिता जिल्हा प्रशासन सज्ज

सजग वेब टिम, पुणे

जुन्नर | पुणे जिल्ह्यामध्ये दुष्काळ निवारण्यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांकरीता जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.
याकरिता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये दुष्काळ तक्रार निवारण व आपत्ती व्यवस्थापनाकरिता कक्ष सुरू करण्यात आला आहे. या कक्षामार्फत नागरिकांकडून दुष्काळाविषयी येणाऱ्या तक्रारींकरिता स्वतंत्रपणे नोंद घेण्यात येऊन चारा छावणी, पाणी टंचाई व त्याबाबतच्या उपाययोजना करण्यासाठी तात्काळ कार्यवाही करण्यात येत आहे.

जिल्ह्यामध्ये टॅंकरची मागणी आल्यास 24 तासात मंजुरी देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे आतापर्यंत 6 चारा छावण्यांना मंजुरी देण्यात आली आहे. चारा छावण्यांच्या नवीन प्रस्तावांना 24 तासांतच मंजुरी देण्यात येऊन त्याची कार्यवाही करण्यात येत आहे. चाऱ्याच्या उपलब्धेकरिता मे 2019 पर्यंत नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार कृषि विभाग, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभागाकडील चारा पिकाखाली, पशुसंवर्धन विभागाकडील कामधेनु दत्तक ग्राम योजना, वैरण विकास योजना, जिल्हा परिषद सेस अंतर्गत, उसाच्या वाढ्यांपासून, आत्मा आणि टीएससी/केव्हीके, जलाशय, तलावाखालील गाळपेरापासून, कृषि विभागाकडून उन्हाळी हंगाम अशा एकूण दोन लाख हेक्‍टर क्षेत्रापासून एकूण 14 लाख टन तर उसापासून उपलब्ध होणारा चारा (व्होल) 13 लाख टन अशा एकूण 27 लाख टन चाऱ्याचे नियोजन मे 2019 अखेर करण्यात आलेले आहे. याकरिता पुरेसा निधी उपलब्ध झालेला आहे.दुष्काळ निवारण, टॅंकर मागणी, चारा छावणी तसेच आपत्ती व्यवस्थापन इ. विषयांकरीता नागरिकांनी त्यांच्या तक्रार किंवा सूचनांकरिता 1077 या टोल फ्री व 020- 26123371 या संपर्क क्रमांकांचा वापर करावा, असे जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी आवाहन केले आहे.

Read more...

शिक्षण व सहकार क्षेत्रातील बहुआयामी व्यक्तिमत्त्व जनार्दन(मास्तर) बांगर कालवश

सजग वेब टीम, जुन्नर
बेल्हे| मुंबई एज्युकेशन बोर्डाचे माजी उपायुक्त आणि विशाल जुन्नर नागरी पतसंस्थेचे संस्थापक जनार्दन रभाजी बांगर उर्फ जना मास्तर यांचे अल्पशा आजाराने मुंबई  येथे राहत्या घरी देहावसान झाले.मृत्यूसमयी त्यांचे वय ७१ वर्षाचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी,एक मुलगा,सहा मुली,सून,जावई,नातवंडे आणि भाऊ असा मोठा परिवार  आहे बेल्हे (गुंळूचवाडी) शिवारात शेतकरी कुटुंबात जन्मलेले जनार्दन रभाजी बांगर हे मुबंई एज्युकेशन बोर्डाचे उपयुक्त असताना राज्यातील अनेक शिक्षण संस्थेच्या संचालकाना मार्गदर्शन करून संस्था जगविल्या असल्याचे बोलले जाते.मुबंई येथे नोकरी-व्यवसायांच्या निमित्ताने आलेल्या बेल्हे परिसरातील व्यक्तींना एकत्र करून बेचाळीस वर्षांपूर्वी दिन दुबळ्या घटकांना उभे करण्यासाठी भायखळा येथे,विशाल जुन्नर सहकारी पतसंस्थेची स्थापना केली.त्यानंतर तालुक्यातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सुविधा उपलब्ध व्हावी,यासाठी त्यांनी विशाल जुन्नर सेवा मंडळा ची स्थापना करून आळे येथे सर्वप्रथम औषध निर्माण महाविद्यालय सुरु केले.परिसरात शिक्षण व सहकार क्षेत्रातील एक आदर्श व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांना ओळखले जाते,आज सकाळी मुंबई येथे राहत्या घरी त्यांचे देहावसान झाले,सायंकाळी बेल्हे येथील गंगाद्वार स्मशानभूमीत राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांच्या देहाला अग्निसंस्कार करण्यात आले.
Read more...

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला – विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे

शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न पेटला
विद्यमान खासदारांना फटका बसण्याची चिन्हे 

सजग वेब टीम, शिरूर

शिरूर | शिरुर तालुक्याच्या पश्चिम भागातील पाण्याचा प्रश्न ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पेटला आहे. त्यामुळे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

शिवाजीराव आढळराव पाटील सगल तीन वेळा खासदार होते. पैकी दोन पंचवार्षिकपासून हा भाग त्यांच्या मतदारसंघात जोडण्यात आला आहे. मात्र या भागात अद्याप पाण्याचा प्रश्न गंभीर आहे.

केंदूर आणि पाबळसह या भागातील १२ गावांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. पाणी नाही तर मतदान नाही, असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे.

दरम्यान, शिरुरच्या पश्चिम पट्ट्यात आढळरावांना चांगलं मताधिक्य मिळतं, मात्र पाण्याचा प्रश्न पेटल्यामुळे नागरिकांच्या रोषाचा मोठा फटका आढळरावांना बसण्याची शक्यता आहे.

Read more...

जुन्नर तालुक्यातील शिरोली गावचा कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा

सजग वेब टीम, जुन्नर

जुन्नर – शिरोली गावचा जुन्नर तालुक्याचा भूमीपुत्र म्हणून डाॅ अमोल कोल्हे यांना गावबैठक घेऊन जाहीर पाठिंबा दिला आहे. विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशिल शेरकर यांच्या नेतृत्वाखाली शिरोली गावाने एकत्र येऊन गावची बैठक घेऊन एकजुटीने कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा जाहिर केला आहे. याआधी नारायणगाव, वारूळवाडी या गावांनीही कोल्हे यांना एकमुखी पाठिंबा जाहीर केला आहे. या बैठकीनंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकजुटीने काम करत असल्याचे चित्र जुन्नर तालुक्यात दिसत आहे हे आघाडीसाठी आशादायक म्हणावं लागेल.

Read more...

परिवर्तनाशिवाय पर्याय नाही, तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचणार – डॉ. अमोल कोल्हे

सजग वेब टीम, जुन्नर 

डॉ. अमोल कोल्हे : जुन्नर तालुक्‍यातील गावभेट दौऱ्याला उत्स्फूर्त प्रतिसाद

अणे- जनतेला काय सुविधा दिल्या?, तरुणांना रोजगार मिळाला का? 15 वर्षांत कोणती विकासकामे झाली? हे साधे सरळ प्रश्‍न आहेत आणि ते आपण विचारणारच. हे प्रश्‍न उपस्थित केले म्हणून खालच्या पातळीवर खासदार टीका करतात. मात्र, आता परिवर्तनाशिवाय पर्याय नाही. जे 15 वर्षांत घडले नाही ते यापुढे दिसणार व त्यासाठी तरुणाईचा आवाज संसदेत पोहोचला पाहिजे, असे रोखठोक प्रतिपादन डॉ. अमोल कोल्हे यांनी केले.

शिरूर लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेस व महाआघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्या प्रचारार्थ जुन्नर तालुक्‍यात मंगळवारी (दि. 16) आयोजित केलेल्या गावभेट दौऱ्याला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. इतकेच नाही तर, यंदा परिवर्तन अटळ हा नाराही गावागावातून देण्यात आला. तर अणे येथे झालेल्या सभेत डॉ. कोल्हे बोलत होते. यावेळी अतुल बेनके, गणपत फुलवडे, उज्ज्वला शेवाळे, सत्यशील शेरकर, संजय काळे, अशोक घोलप, गणपत फुलवडे, किशोर दांगट, शंकर पवार, शरद लेंडे, बाळासाहेब दांगट, दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट, प्रकाश बालवडकर आदी मान्यवर उपस्थित होते. दलित आघाडीचे संस्थापक अध्यक्ष अशोक अल्हाट यांनी यावेळी आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला.

डॉ. अमोल कोल्हे म्हणाले की, आज शिरूर लोकसभेची निवडणूक आहे. मात्र, मला राज्यातून फोन येत आहेत. आम्हाला तुमच्याबरोबर काम करायचे आहे. हाच विश्‍वास मी कमावला आहे. संसदेत सर्वसामान्यांचा, तरुणाईचा, महिलांचा, शेतकऱ्यांचा आवाज माझ्या रूपाने असणार आहे. हा माझा शब्द आहे. आज प्रत्येक गावात तरुणाईसह सर्व वर्गातून भरभरून प्रतिसाद मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

Read more...