महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे कार्यालयावर युवासेनेचा धडक मोर्चा

सजग वेब टीम

पुुणे – दहावीच्या परीक्षेत २० गुणांची तोंडी परीक्षा रद्द करून महाराष्ट्रातील जवळपास १५ लाख विद्यार्थ्यांवर अन्याय करणाऱ्या महाराष्ट्र राज्य शालेय शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराच्या निषेधार्थ शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली युवासेनेच्या वतीने गुरुवार दिनांक ३१ जानेवारी २०१९ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, बी.एम.सी.सी. कॉलेज रोड, बी.एम.सी.सी. कॉलेज शेजारी, पुणे येथील कार्यालयावर धडक मोर्चा आंदोलन करण्यात आले.

यावेळी युवासेनेच्या वतीने जोरदार आंदोलन करत महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा डॉ.सौ.शकुंतला काळे, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक मंडळ पुणे यांचे अध्यक्ष डॉ.सुनिल मगर यांना घेराव घालण्यात आला. आंदोलकांनी ह्या अन्यायकारक कायद्याचे समर्थन करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या राजीनाम्याची मागणी करत ह्या अन्यायकारक मागण्या मान्य होईपर्यंत उठणार नसल्याचा पवित्रा युवासेना पदाधिकाऱ्यांनी घेताच काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांना २० अंतर्गत गुण दिले जातात, तर इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांना ४० अंतर्गत गुण दिले जातात. आता तर एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांना मिळणारे २० गुणही गुणवत्ता वाढीच्या सबबीसाठी रद्द करण्याचा निर्णय शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांच्या आग्रहाखातर महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने घेतला आहे. त्यामुळे एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांचे एकूण गुणही इतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत कमी होणार आहेत. परिणामी अकरावी प्रवेशावेळी एस.एस.सी.बोर्डाच्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता असूनही नामांकित महाविद्यालयात प्रवेश मिळणे कठीण होणार आहे.

दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या वर्षी दहावीचा अभ्यासक्रम बदललेला आहे. प्रश्नपत्रिकेच्या पॅटर्नमध्येही बदल करण्यात आला आहे. त्यातच अंतर्गत गुणही रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या सगळ्यामुळे दहावीचे विद्यार्थी आणि त्यांचे पालक प्रचंड तणावाखाली आहेत. या साऱ्यांच्या परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होण्याची दाट शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी जितकी लेखी परीक्षा महत्वाची आहे तितकेच महत्व तोंडी परिक्षेलाही आहे.काळाची गरज ओळखून पाठांतराला जास्त महत्व न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी प्रत्यक्ष कार्यानुभव असणे जास्त गरजेचे आहे. असे विचार मांडले जात असताना प्रत्यक्षात मात्र अंतर्गत गुण रद्द करून लेखी परीक्षेला जास्त महत्व दिले जात आहे. ही दुर्दैवाची बाब आहे.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हितावह नसलेला हा निर्णय रद्द व्हावा यासाठी शिवसेनेच्या आमदारांसह युवासेनेच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ह्यांना भेटून ह्याबाबत निवेदन देण्यात आले होते. ह्या अन्यायकारक निर्णयात त्यांना विशेष रस असल्यानेच हा प्रश्न निर्माण झाल्याची भावना विद्यार्थी व पालकांमध्ये आहे. महाराष्ट्रातील १५ लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता अंतर्गत गुण रद्द करण्याचा निर्णय तातडीने रद्द करावा व हा निर्णय तात्काळ न घेतल्यास शिवसेना नेते , युवासेनाप्रमुख मा.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा युवसेनेच्या वतीने देण्यात आला.

ह्या आंदोलनात शिवसेना पुणे जिल्हा संपर्कप्रमुख मा.बळाभाई कदम, शिवसेना पुणे शहरप्रमुख मा.आमदार मा.चंद्रकांत मोकाटे, मा.आमदार मा.महादेव बाबर, युवासेना कार्यकारिणी सदस्य पवन जाधव, युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.साईनाथ दुर्गे, युवासेना कार्यकारिणी सदस्य मा.रूपेश कदम, युवासेना सचिव मा.दुर्गाताई शिंदे, मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्य मा.प्रविण पाटकर, युवासेना सिनेट सदस्या मा.सुप्रियाताई कारंडे, युवासेना विस्तारक मा.सचिन बांगर, युवासेना विस्तारक मा.राजेश पळसकर, युवासेना जिल्हा युवा अधिकारी मा.अविनाश बलकवडे, मा.सचिन पासलकर, शिवसेना उपशहर प्रमुख मा.किरण साळी, विद्यार्थी सेनेचे मा.राम गायकवाड, युवासेना उपजिल्हा युवा अधिकारी मा.शिवाजी काळे, मा.अजय घाटे, मा.बाळकृष्ण वांजळे, युवासेना आंबेगाव तालुका युवा अधिकारी मा.प्रविण थोरात पाटील, मुळशी तालुका युवा अधिकारी मा.संतोष तोंडे, विधानसभा युवा अधिकारी मा.चेतन चव्हाण, मा.राम थरकुडे, मा.कुणाल धनावडे, मा.सुरज लांडगे, मा.निरंजन धाबेकर, मा.देविदास आढळराव पाटील, यांच्यासह पुणे जिल्ह्यातील युवासेना पदाधिकारी, शिवसैनिक, युवासैनिक, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read more...

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील शाळांमध्ये महात्मा गांधी पुण्यतिथी कार्यक्रम संपन्न

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध कार्यक्रम संपन्न

सजग वेब टीम, प्रमोद दांगट – आंबेगाव

आंबेगाव तालुक्यातील आदिवासी भागातील निगडाळे,भागीतवाडी,राजेवाडी,तळेघर,राजपूर आदी जिल्हा परिषद प्राथमिक,शासकीय आश्रमशाळा व माध्यमिक विद्यालयांत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.याप्रसंगी शाळांमध्ये दोन मिनिटे मौन पाळून महात्मा गांधींना श्रद्धांजली वाहण्यात आली.प्रभातफेरी,बालसभा,ग्रामस्वच्छता अशा विविध उपक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.
निगडाळे येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची पुण्यतिथी ‘हुतात्मा दिन’ म्हणून साजरी करण्यात आली. प्रभातफेरी,बालसभा,अहिंसा शपथ,ग्रामस्वच्छता अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन यावेळी करण्यात आले.सुरुवातीला स्वच्छता प्रभातफेरी काढून ग्रामस्थांमध्ये ‘स्वच्छ भारत अभियाना’ ची जनजागृती करण्यात आली.त्यानंतर शाळेत महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.यावेळी दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.‘रघुपती राघव राजाराम…’ हे भजन व सर्व धर्म प्रार्थनेचे गायन करण्यात आले.याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तुकाराम कुऱ्हाडे,सुनिल लोहकरे,प्रदीप कुऱ्हाडे,अंगणवाडी सेविका नंदाबाई लोहकरे,मदतनीस लीलाबाई लोहकरे,विद्यार्थी उपस्थित होते.शाळेत आयोजित केलेल्या बालसभेच्या अध्यक्षस्थानी विद्यार्थी यश कुऱ्हाडे होता.यावेळी श्रेया लोहकरे,साहिल लोहकरे,ऋतुजा भोमाळे आदी विद्यार्थ्यांनी भाषणे केली.विद्यार्थी सुमित लोहकरे याने महात्मा गांधी यांची वेशभूषा केली होती.शांती, सद्भाव आणि अहिंसेच्या मार्गावर चालण्याची शपथ घेण्यात आली.यावेळी विद्यार्थ्यांनी मंदिर,ग्रामपंचायत,अंगणवाडी,शाळा परिसरात स्वच्छता केली.आभार संतोष थोरात यांनी मानले.युवा कार्यकर्ते निलेश लोहकरे यांच्या वतीने खाऊ वाटप करून कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला .
भागीतवाडी शाळेत राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून पूजन करण्यात आले.यावेळी बालसभेचे आयोजन करण्यात आले होते.विदयार्थी छाया लांघी,शिवम भालेराव,समीक्षा कोळप यांनी महात्मा गांधी यांच्या जीवनपरिचय आपल्या भाषणातून उलगडून सांगितला.यावेळी उपशिक्षिका सविंद्रा कोळप यांनी बालसभेला उद्बोधित केले.याप्रसंगी अंगणवाडी शिक्षिका सुलाबाई कोळप,पोलिस पाटील दत्तात्रय बेंढारी,शाळा व्यवस्थापन अध्यक्ष मारूती उंडे,रुख्मिणी भागीत उपस्थित होते.मुख्याध्यापक मंगेश बुरुड यांनी आभार मानले.
राजेवाडी शाळेत महात्मा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिक्षणतज्ञ सरस्वती साबळे,मुख्याध्यापक यमना साबळे,पदवीधर शिक्षक लहू घोडेकर,एकनाथ मदगे व संदीप माळी तसेच विदयार्थी उपस्थित होते.
तळेघर शाळेत महात्मा गांधी पुण्यतिथी साजरी करण्यात आली.मुख्याध्यापक बुधाजी पारधी,सावळेराम आढारी,किसन केंगले,मनोहर थोरात,विद्यार्थी उपास्थित होते

Read more...

खरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री

 

खरपुडी येथील खंडोबा मंदिर परिसरात गावठी दारूविक्री

सजग वेब टीम, बाबाजी पवळे – राजगुरूनगर

राजगुरुनगर- खेड तालुक्याच्या पुर्व भागात खुलेआम गावठी दारूचे धंदे सुरू असून अवैध धंद्यांमुळे तरुण पिढी वहावत चालली आहे.या अवैध धंद्यांना आळा घालावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे…

खेड  तालुक्यापुर्व भागातील खरपुडी,दावडी, निमगाव या परिसरात गावठी दारूचे धंदे सुरू असून हा धंदा राजरोस व निर्भयपणे सुरु असल्याचे चित्र दिसत आहे. तालुक्‍यातील ,गोसासी, रेटवडी, कनेरसर परिसरात दारूधंदे राजरोसपणे संबंधितांकडून चालवले जातात.त्यामुळे या अवैध धंद्यांना रोखणार तरी कोण असा प्रश्‍न उपस्थित होत आहे. गावठी दारू धंद्यांवर कारवाई व्हावी, गावठी दारू तयार होऊच नये, गावठी दारूधंदे बंद करणे व ते पून्हा सुरु होणार नाहीत. बेकायदेशीर दारू उत्पादन व विक्री होऊ नये, ही जबाबदारी उत्पादन शुल्क विभागाची असल्याने याकडे उत्पादन शुल्क विभागाने लक्ष देणे गरजेचे असते. यासाठी उत्पादन शुल्क विभागाने पोलिसांची मदत घेऊन कारवाई करणे अपेक्षित आहे. सरकारमान्य देशी दारुची दुकाने सकाळी दहा नंतरच उघडली जातात. मात्र गावठी दारू पहाटेपासूनच सर्वत्र उपलब्ध होते. त्यांच्यावर वेळेचे बंधन व अंकुश नाही. या धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. मात्र गावठी दारूचा धंदा बंद होणे गरजेचे असताना देखील राजरोसपणे गावठीची विक्री सुरु आहे. पुर्व भागात ठिकठिकाणी अवैध धंदे बोकाळले आहेत. त्यामुळे अनेकांचे संसार उद्धवस्थ होऊ लागले आहेत. हे धंदे बंद करण्याची मागणी होत आहे. हॉटेल व ढाब्यावर मिळणारी दारू यामुळे तरुणपिढी व्यसनांच्या आहारी गेल्याचे चित्र आहे. या वाढलेल्या अवैध धंद्यांच्या पैशातूनच या परिसरात हाणामारीचे प्रकार वाढले आहेत.

तसेच या परिसरात गुन्हेगारी घटना घडत आहेत खरपुडी खुर्द (ता खेड ) येथे दोन दिवसांपुर्वी गावठी दारूचा धंदा सुरू करण्यात आला आहे.या ठिकाणी खड्डा घेऊन गावठी दारू रापण्यास ठेवली आहे.. या परिसरात गावठी दारुचा वास सुटला आहे. पोलीस प्रशासनाने तातडीने कारवाई करण्याची ग्रामस्थ मागणी करत आहेत

Read more...

बाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके

बाबूजी म्हणजे मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ – श्रीधर फडके

सजग वेब टीम – बाबाजी पवळे, राजगुरूनगर

राजगुरूनगर-महाराष्ट्रातील संगीत क्षेत्रात एक अग्रगण्य नाव असलेले बाबूजी म्हणजे सुधीर फडके यांनी तब्बल ४५ वर्ष मराठी संगीतसृष्ठी गाजवताना त्यांच्या सुरांनी शब्दांना सजवले. उत्तम गायक, संगीत दिग्दर्शक, भावगीत गायक, शास्त्रीय सुगम संगीतकार  अशी त्यांची विविध रूपे महाराष्ट्राने अनुभवली. ते खऱ्या अर्थांने मराठी मनामनांत रुजलेलं स्वरतीर्थ होते अशी भावना ज्येष्ठ संगीतकार आणि गायक श्रीधर फडके यांनी व्यक्त केली ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटीलस्मृती  व्याख्यानमालेत  बाबूजींची गाणी जीवनाची गाणी या विषयावर बोलत होते.

या प्रसंगी संस्थेचे संचालक बाळासाहेब सांडभोर,  डॉ.रोहिणी राक्षे, अॅड. माणिक पाटोळे,  अंकुश कोळेकर,  उमेश आगरकर, प्राचार्य डॉ. एस.बी. पाटील,  व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला  बुट्टेपाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड, प्रबंधक कैलास पाचारणे व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

गायक श्रीधर फडके यांचे स्वागत अॅड. राजमाला  बुट्टेपाटील यांनी केले.

श्रीधर फडके यांनी बोलताना सांगितले की संगीत क्षेत्रात बाबूजींचे नाव जोडले गेले ते गीतरामायण या त्यांनी गायिलेल्या संगीतरामकथेशी. ग.दि.माडगूळकर त्यांनी शब्धबद्ध केलेले व बाबूजींनी गायिलेल्या गीतरामायणाने मराठी मनावर आजही गारुड केले आहे. ते पुढे म्हणाले की, सुधीर फडके ज्या पद्धतीने जगले त्याचा स्पर्श त्यांच्या गाण्याला झाला आहे. उदात्त, उत्कट मूल्यांची कास धरून आणि सत्यतेची साथ न सोडता ते जगले असे सांगून त्यांच्या गाण्यात दरवळणारा सुगंध हे त्याचेच प्रतीक असल्याचे ते म्हणाले. बाबूजींनी गाण्याची चाल आकर्षक, गोड व प्रासादिक असावी यासाठी विशेष लक्ष दिले. प्रखर देशभक्तीच्या भूमिकेतूनही त्यांनी  दादरा नगरहवेली या पोर्तुगीजांच्या ताब्यात असलेल्या भारतातील प्रदेशाची मुक्तता करण्यासाठी केलेल्या कार्याची माहिती विद्यार्थ्यांना दिली.

या कार्यक्रमात श्रीधर फडके यांनी बाबूजींची  झाला महार पंढरीनाथ, जय शारदे, तोच चंद्रमा नभात, धुंदी कळ्यांना, सखी मंद झाल्या तारका, वंद्य वंदे मातरम, ज्योती कलश झलके, पराधीन आहे पूत्र मानवाचा, बलसागर भारत होवो, जाळीमंदी पिकली करवंद, बाई मी पतंग उडवीत होते अशी एकापेक्षा एक सरस आणि सुप्रसिद्ध गाणी सादर करून बाबूजींच्या सुरेल आठवणींना उजाळा दिला.  तसेच त्यांनी स्वतः संगीतबद्ध केलेली फिटे अंधाराचे जाळे, देवाचिया द्वारी, ओंकार स्वरूपा अशी अनेक गाणीही सादर केली. तसेच त्या गाण्यांंमागची कथासुद्धा उलगडून सांगितली. त्यांना आलेले अनुभव, त्यांच्या जीवनात घडलेल्या गोष्टी, बाबूजींच्या आठवणी सांगून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.

या कार्यक्रमात श्रीधर फडके यांना गायिका शिल्पा पुणतांबेकर व तबलजी तुषार आंग्रे यांनी साथ दिली. त्यांची मुलाखत प्रा. शिल्पा टाकळकर यांनी घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. बापूसाहेब चौधरी यांनी, वक्त्यांचा परिचय डॉ. राजेंद्र शिरसी यांनी तर आभार कु. कावेरी भोर हिने मानले.

Read more...

तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड

तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. – प्रवीण गायकवाड

सजग वेब टीम

पुणे  | तरुणांनी राजकारणात येण्यापूर्वी स्वतःचे आर्थिक सक्षमीकरण करावे. आई, वडील आणि आपले कुटुंब यांचे सक्षमीकरण करावे यातूनच समाज घडतो. राजकारण करण्यापेक्षा समाजकारण करावे असा सल्ला संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी एका खासगी माध्यम समूहाला  मुलाखत देताना दिला.

पुढे बोलताना म्हणाले दर्जेदार शिक्षण घ्यावे, असे कोर्सेस करा की ज्यातून रोजगार मिळेल. त्यासाठी स्किल डेव्हलपमेंट सारखे कार्यक्रम राबविले पाहिजे. त्यासोबतच ग्रामीण भागातील तरुणांनी शेतीपूरक व्यवसाय करावा असे यावेळी सांगितले.

मला कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर दिली होती

या मुलाखती मध्ये संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष गायकवाड यांनी अनेक गोष्टींचा उलघडा केला आहे. पुढे बोलताना म्हणाले, भाजपचा मराठा चेहरा म्हणून २०१४ मध्ये गोपीनाथ मुंडे यांनी मला कॅबिनेट मंत्री पदाची ऑफर दिली होती. २०१२ पासून ते २०१४ पर्यंत अनेकवेळा भाजपचे ज्येष्ठ दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांनी सोशल इंजिनिअरिंगच्या माध्यमातून सर्व समाजाचे नेते एकत्रित करीत होते. मराठा समाजाचा चेहरा म्हणून अनेकवेळा त्यांनी भाजपमध्ये येण्याविषयी माझ्यासोबत चर्चा केली. त्यासोबतच कॅबिनेट मंत्री पदाची सुद्धा ऑफर दिली होती, परंतु मला त्या विचारधारेवर विश्वास नाही आणि कधी त्याच्याशी तडजोड केली नसल्याने मंत्री पद नाकारले होते. मला राजकीय संधी होती पण विचारधारा कधीच सोडली नाही.

भाजप सरकार प्रतिगामी

देशभरात भाजपचे सरकार असले तरी मी भाजप हा पक्ष असल्याचे मी मानत नाही. कारण भाजपचे सगळे नेते आरएसएसच्या मुशीत तयार झालेले आहेत. त्यामुळे हे सरकार भाजपचे नसून आरएसएस विचारधारेचे सरकार आहे. मुळात भाजप हा पक्षच नाही. भारतातील पक्ष हे विकासावर नाहीतर विचारधारेवर चालतात. आपली सामाजिक आणि सांस्कृतिक लढाई आहे. सध्या देशात घटना विरोधी सरकार असून घटना विरोधी कायदे करते. घटनेत आर्थिक निकषावर आरक्षणाची तरतूदच नाही हे सरकार घटना पायाखाली तुडवण्याचं काम करतंय, प्रतिगामी सरकार असून यांनी धोरणे द्वेष पसरवणारे आहेत. गोरक्षकाचा मुद्दा असो किंवा तिहेरी तलाकचा मुद्दा घेऊन मुस्लिमांमध्ये एक वातावरण तयार करून एका विशिष्ट समाजाला बाजूला ठेवायचं, धर्माचे राजकारण करून कायम देश असुरक्षित करायचं, या सर्व गोष्टींमुळे घटनेच्या चौकटीला धोका निर्माण झाला आहे. यासाठी पुरोगामी, सामाजिक आणि राजकीय पक्षांनी एकत्र येऊन लढलं पाहिजे. हा धोका मूलतत्वाला म्हणजे शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकरांच्या समतावादी विचाराला धोका झाला आहे.

काँग्रेस सर्व समावेशक पक्ष

देशामध्ये काँग्रेस आणि भाजप दोन मुख्य पक्ष आहेत. त्यासोबत अनेक राजकीय दृष्ट्या स्थानिक अस्मिता निर्माण होऊन राज्यस्तरीय अनेक पक्ष निर्माण झाले असले तरी मोठ्या प्रमाणात पुरोगामी विचारधारेची पक्ष आहेत. मत विभाजन टाळण्यासाठी सर्वानी एकत्रित येणे गरजेचे आहे.

सध्या काँग्रेसची बदलती भूमिका असून तरुणांना आकर्षित करणारे राहुल गांधींचे नेतृत्व आहे. काँग्रेसचे सर्वसमावेशक विचार पुढे आणले असून सोशो पॉलिटिक्स करीत आहे. असा प्रयोग त्यांनी गुजरात मध्ये केला ओबीसी मधून अल्पेश ठाकूर, दलित चेहरा जिग्नेश मेवानी आणि खुल्या प्रवर्गातून हार्दिक पटेल या सामाजिक कार्यकर्त्यांना संघटित करून सोशो पॉलिटिक्स करून नवा पर्याय निर्माण केला होता. असाच प्रयोग राजस्थान आणि मध्यप्रदेशात केला होता, त्यात काँग्रेसला मोठं यश मिळालंय.

संभाजी ब्रिगेड बहुजनांची संघटना

संभाजी ब्रिगेड हि सामाजिक संघटना असून संघटनेचे ब्राम्हणेत्तर विचार आहेत. सामाजिक दबाव गट करून शेवटच्या घटकापर्यंत पोहचण्याचे काम करते. संभाजी ब्रिगेड दोन पातळीवर काम करत असून राजकीय पक्ष म्हणून स्थापन झाला आहे. स्वतंत्र पक्ष म्हणून निवडणूक लढत आहेत. मी समाजामध्ये नैसर्गिक गरज होती म्हणून संभाजी ब्रिगेड संघटनेचे प्रदेशाध्यक्ष पद घेतले आहे. संभाजी ब्रिगेड मध्ये दुभंगलेले मतभेत नाहीत. मराठा सेवा संघ आणि संभाजी ब्रिगेड हा एकाच परिवार आहे. फक्त राजकीय भूमिकेशी माझा संबंध नाही. संभाजी ब्रिगेड पक्ष हा स्वतंत्र निवडणूक लढवीत आहे, मात्र यावेळेस परिस्तिथी वेगळी असून संभाजी ब्रिगेड पक्षाने पुरोगामी आघाडी मध्ये यावे त्यांचे स्वागत होईल.

आमचा यापूर्वी शिवराज्य पक्ष होता पण त्याला यश मिळाले नाही. संभाजी ब्रिगेडला पक्ष करताना ब्राम्हणेत्तर पक्ष असलेला शेतकरी कामगार पक्ष पर्याय होऊ शकतो, असे मला स्वतःला वाटले म्हणून शेतकरी कामगार पक्षात प्रवेश केला. शेतकरी कामगार पक्षाचे चांगले धोरणे आहेत, त्यांनी रोजगार हमी योजना, कुळ कायदा यासारखे अनेक लोकोपयोगी कामे केली आहेत. या पक्षाला ऐतिहासिक पार्श्वभूमी होती त्यामुळे हा पर्याय निवडला.

१६ टक्के आरक्षण एक मृगजळ

गेल्या दोन वर्षांमध्ये मराठा क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून मोर्चे शांततेत पार पडले. त्यानंतर ठोक मोर्चा निघाला होता. त्याला हिंसक वळण लागले होते, त्यात १० हजार कार्यकर्यांवर गुन्हे नोंदले गेले. ३८ कार्यकर्त्यांनी आरक्षणासाठी आत्मबलिदान दिले. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती एम.जी.गायकवाड यांची इतर मागासवर्गीय आयोगाची निर्मिती करण्यात आली होती. त्या आयोगाने केलेल्या अभ्यासातून सामाजिक आणि शैक्षणिक मागासलेपणा सिद्ध झाला. अपेक्षा होती की ओबीसी प्रवर्गात कुणबी म्हणून समावेश होईल. मराठा आणि कुणबी एकच आहेत सिद्ध करण्यासाठी ९१ पुरावे दिले आहेत. मुळात मराठा ही जात नसून महाराष्ट्रातला समूह आहे, कुणबी ही जात आहे.

महाराष्ट्र सरकारने जे १६ टक्के आरक्षण दिले ५० टक्केच्या वर जाणारे आरक्षण असून ते एसईबीसी दिले आहे. हे आरक्षण मुळातच टिकणार नाही. एम.जी.गायकवाड यांच्या आयोगाने मराठा समाजाचा मागासलेपणा सिद्ध केले आहे. केंद्राने नवीन १० टक्के आरक्षण राज्यसभेत आणि लोकसभेत मान्य करून घेतला. राष्ट्रपतींनीही सही केली आहे. अनेक राज्यात लागू करण्यात आला, त्याला सुद्धा आर्थिक निकषाद्वारे मर्यादा घातल्या आहेत. घर, शेती किती, आठ लाखांपेक्षा कमी उत्पादन असलेल्या लोकांना मिळणार आहे. ज्यांना इतर मागास वर्गाचा दर्जा दिला त्यांना हे आरक्षण मिळणार नाही.

मराठा समाजाची अशी अवस्था झाली ५० टक्केच्या वर जाणारे १६ टक्के आरक्षण दिले. जे मुळात मिळणारच नाही, ते एक मृगजळ आहे. १० टक्के सवर्ण किंवा आर्थिक निकषावरील आरक्षण तेही मिळणार नाही. कारण इतर मागासवर्गीयांप्रमाणे मराठा समाजाचे मागासलेपणा सिद्ध झाला आहे.

अडीच कोटी पेक्षा जास्त मराठा समाज कमिटी मोर्च्याच्या माध्यमातून मोठ्या अपेक्षेने रस्त्यावर उतरले होते. मराठा समाजाची आर्थिक कुचंबना झाली होती, शेती परवडत नाही, शेतकरी आत्महत्या करीत आहेत . मात्र क्रांती मोर्चांमुळे एक आशा निर्माण झाली होती, न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करणारी आणि घटनात्मक आरक्षण मिळेल. आम्हाला आमचे हक्क आणि अधिकार मिळतील. परंतु आता अशी परिस्थिती झाली आहे १६ टक्के तर नाहीच पण १० टक्के सुद्धा आरक्षण मिळणार नाही.

दलित-मराठा दंगल करण्याचा प्रयत्न अयशस्वी

गेल्यावर्षी कोरेगाव भीमा येथे दलित-मराठा यांच्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला. या मागे षडयंत्र कुणाचे असू शकते तर हे सरकार पेशवाईचे सरकार आहे. पेशवाईचा वारसा मानणाऱ्या सरकारच्या काळात जर कोणी पेशवाईच्या पराभवाचा उत्सव साजरा करीत असेल तर हे त्यांना कधीच पटणार नाही. म्हणून हिंदुत्ववादी लोकांना वाईट वाटले म्हणून हे सगळे घडले. त्यासोबतच यामध्ये संभाजी भिडे गुरुजी आणि मिलिंद एकबोटे यांची नावे का आली ? त्यांची नावे कोणी घेतली ? त्या भागात तीन महिन्यापूर्वी कुणी बैठका घेतल्या ? याबाबतचा पोलिसांचा अहवाल आल्यावरच सत्य बाहेर येईल. राज्यात संभाजी ब्रिगेडमुळे मराठा आणि दलितांमध्ये एकोपा निर्माण झाला आहे.

तर खासदार संभाजी राजेंचे स्वागत करतील

कोल्हापूरचे छत्रपती संभाजीराजे यांची राष्ट्रपती नियुक्त सदस्य म्हणनू राज्यसभेवर नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे ते भाजपचे खासदार नाहीत. त्यांचीही एक राजकीय महत्वकांक्षी होती त्यांना खासदार व्हायचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ती पूर्ण करायला हवी होती, पण ती इच्छा भाजपकडून पूर्ण करण्यात आली.

युवराज संभाजी राजे हे आमच्यासोबत २००७ पासून जोडले गेले होते. २००९ मध्ये राष्ट्रवादीच्या वतीने कोल्हापूरमधून लोकसभेची निवडणूक लढविली होती, पण त्यात त्यांचा पराभव झाला. त्यांनतर ते आमच्यासोबत शिवशाही यात्रेत महाराष्ट्रभर फिरले. मुंबईत मराठा आरक्षण मोर्चाचे नेतृत्व केले. मला वाटते ते पुन्हा शिवराय, फुले, शाहू आणि आंबेडकर विचारांचे काम करण्याचे ठरवले तर पुरोगामी विचारांचे लोक त्यांचे मोठ्या प्रमाणात स्वागत करतील. तसेच ते पुन्हा सामाजिक कार्यात परत येतील असा मला विश्वास आहे.

Read more...

मीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

मीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

कालवा समितीत प्रत्येक गावचा एक प्रतिनिधी असावा – अमित बेनके

सजग वेब टीम

नारायणगाव | येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर पाणी पुरवठ्यासाठी मीना वर अवलंबून असणाऱ्या 12 गावच्या शेतकऱ्यांनी आज (30 जानेवारी 2019) मोर्चा काढला होता.या वेळी शाखा अभियंता मांडे यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी वडज,पिंपळगाव,कुरण,वडगाव सहानी, सावरगाव, बस्ती,खिलारवाडी,धोंडकरवाडी, विठ्ठलवाडी,निमदरी,निमगाव म्हाळुंगे, या गावचे शेतकरी व ग्रामस्थ तसेच अमित बेनके व जिल्हा प. सदस्य गुलाब पारखे उपसस्थित होते.
मागील आवर्तन शेतकऱ्यांना कल्पना न देता सुरू केल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी केला,तसेच या वेळी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडले गेल्याने प्रतिनिधी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला.तर पाणी सोडणार असल्याचे जाहीर प्रकटन करण्यात आले होते असे अधिकरी म्हणाले ,मात्र तसा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलाही कागद अथवा पत्र आले नसल्याचे ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले.अचानक सोडलेल्या पाण्यामूळे आमच्या मोटारी वाहून गेल्या तर विहिरीत काम सुरू असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे विहिरीत कामगार अडकल्याचेही काही शतकर्यांनी सांगितले.
मागील अवर्तनाला मोठा काळ उलटून गेला असल्याने मीना पत्राच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा,तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे.पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु पाणी नसल्याने हाता तोंडाशी आलेले पीक जळून जाण्याची भीती या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.
आर्वी गावाच्या वरील भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आता जर आवर्तन सोडले नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.
धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पर्यंत पाणी उपसा करण्यास परवानगी आहे मात्र खालचा शेतकरी पाण्यावाचून मरतो आहे.मग हा भेदभाव कशासाठी? असा सवाल शेतकऱ्यांनी उपस्थित केला.
पाणी सोडण्याचा अधिकार कालवा समितीला आहे.तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याचे नियोजन करण्यात येत असते.सदर निवेदन हे अधीक्षक अभियंत्याला पाठवणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला जाईल असे शाखा अभियंता मांडे म्हणाले.
तर “आम्हाला ठोस निर्णय हवा,पत्र पोहचवायची कामे करू नका,तसेच कलवा समितीमध्ये प्रत्येक गावच्या प्रतिनिधींचा समावेश करा” असे अमित बेनके म्हणाले.
पाठबंधारे विभागाने पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी विनंती जी.प सदस्य गुलाब पारखे यांनी अधिकाऱ्यांना केली,तसेच पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येईल अशी शाश्वती त्यांनी दिली.
गेल्या आठवड्यात एक स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना ,तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शरद दादा सोनवणे यांनी दिली होती,मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत आहे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकरी समाज दर्पणशी बोलताना म्हणाले.

मीना खोऱ्यातील १२ गावच्या ग्रामस्थांकडून त्वरित पाणी सोडण्याची मागणी, अधिकाऱ्यांना धरले धारेवर

नारायणगाव,ता.३०(प्रतिनिधी)
येथील पाटबंधारे विभागाच्या कार्यालयावर पाणी सोडण्याच्या मागणीसाठी मीना कालव्यावर अवलंबून असणाऱ्या जुन्नर तालुक्यातील १२ गावच्या शेतकऱ्यांनी मोर्चा काढला होता. या वेळी शाखा अभियंता मांडे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी वडज, पिंपळगाव, कुरण, वडगाव सहानी, सावरगाव, बस्ती, खिलारवाडी, धोंडकरवाडी, विठ्ठलवाडी, निमदरी, निमगाव म्हाळुंगे या गावचे शेतकरी व ग्रामस्थ तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते अमित बेनके व जि. प.स. गुलाब पारखे उपस्थित होते.

मागील आवर्तन शेतकऱ्यांना कल्पना न देता सुरू केल्याचा आरोप या वेळी शेतकऱ्यांनी प्रशासनावर केला, तसेच या वेळी नियोजनापेक्षा अधिक पाणी सोडल्याने लोकप्रतिनिधी व अधिकारी यांच्यात ताळमेळ नसल्याचा आरोपही यावेळी ग्रामस्थांनी केला. तर पाणी सोडणार असल्याचे जाहीर पत्रक काढण्यात आले होते अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली ,मात्र तसा ग्रामपंचायतीपर्यंत कुठलाही कागद अथवा पत्र आले नसल्याचे ग्रामपंचायत प्रतिनिधींनी सांगितले. अचानक सोडलेल्या पाण्यामूळे आमच्या मोटारी वाहून गेल्या तर काही ठिकाणी विहिरीत काम सुरू असताना अचानक आलेल्या पाण्यामुळे विहिरीत कामगार अडकल्याचेही काही शेतकऱ्यांनी सांगितले.

मागील आवर्तनाला मोठा काळ उलटून गेला असल्याने मीना नदी पात्राच्या परिसरातील गावांना पिण्याच्या पाण्याचा, तसेच जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. पिकाला शेवटचे पाणी द्यायचे आहे परंतु पाणी नसल्याने हाता तोंडाशी आलेले पीक जळून जाण्याची भीती या वेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

आर्वी गावाच्या वरील भागात पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाल्याने आता जर आवर्तन सोडले नाही तर पाटबंधारे विभागाच्या कार्यालयासमोर जनावरे बांधून आंदोलन करण्याचा शेतकऱ्यांनी इशारा दिला.

धरण क्षेत्रातील शेतकऱ्यांना रब्बी पर्यंत पाणी उपसा करण्यास परवानगी आहे मात्र खालचा शेतकरी पाण्यावाचून मरतो आहे. मग हा भेदभाव कशासाठी? असा सवालही शेतकऱ्यांनी यावेळी उपस्थित केला.
पाणी सोडण्याचा अधिकार कालवा समितीला आहे. तर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली पाण्याचे नियोजन करण्यात येत असते. सदर निवेदन हे अधीक्षक अभियंत्याला पाठवणार असून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडे देखील पाठपुरावा केला जाईल असे शाखा अभियंता मांडे यांनी सांगितले.

तर “आम्हाला ठोस निर्णय हवा,पत्र पोहचवायची कामे करू नका,तसेच कालवा समितीमध्ये प्रत्येक गावच्या प्रतिनिधींचा समावेश करा” असे अमित बेनके म्हणाले.

पाठबंधारे विभागाने पिण्यासाठी, जनावरांच्या चाऱ्यासाठी व शेतीसाठी आवर्तन सोडावे अशी विनंती जी.प सदस्य गुलाब पारखे यांनी अधिकाऱ्यांना केली,तसेच पाटबंधारे विभागाकडून आवर्तन सोडण्यात येईल अशी शाश्वतीही त्यांनी दिली.

गेल्या काही दिवसांपूर्वी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना, तालुक्याला पाणी कमी पडू देणार नाही अशी ग्वाही आमदार शरद सोनवणे यांनी दिली होती, मात्र शेतकऱ्यांना पाण्यासाठी आज रस्त्यावर उतरावे लागत आहे ही मोठी शोकांतिका असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालून लवकरात लवकर यातून मार्ग काढावा अशी विनंती यावेळी बोलताना शेतकऱ्यांनी व्यक्त केली.

Read more...

माध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर

माध्यम शास्त्राचे ज्ञान ही काळाची गरज – नितीन केळकर

सजग वेब टीम

पुणे | ”माध्यम शास्त्राचे ज्ञान आवश्यक आहे,भाषेची आणि अभिव्यक्तीची जी कौशल्ये आपण शाळेपासून शिकवतो त्या भाषेचा संवादासाठी कसा वापर करावा हे आता ज्या माध्यमातून करायचा आहे,ते आताचे माध्यम सोशल मीडिया आहे. तिथे याचा कसा वापर करावा हे शिकवले गेले तरच यांचा योग्य उपयोग होईल “असे पुणे आकाशवाणी केंद्राचे उपसंचालक नितीन केळकर म्हणाले. एस .एस . प्रॉफेशनल्स कॅम्पस आणि नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्टस् महाराष्ट्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या सोशल मीडिया वरील कार्यशाळेच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते.
सोशल मीडियासाठी दृक् श्राव्य माध्यमातून प्रकट होताना वैचारिक कल्पना विस्तार कसा असावा,याविषयी माहिती देणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. प्रशिक्षक अभिजीत टिळक यांनी प्रशिक्षणार्थीना दृक् श्राव्य कसे असावे याविषयी मार्गदर्शन केले. या कार्यशाळेची संकल्पना व नियोजन एनयुजे महाराष्ट्रच्या प्रवक्त्या शिल्पा देशपांडे यांचे होते.
एस.एस. प्रॉफेशनल्स चे संचालक डॉ. शिशिर पुराणिक यांनी भविष्यात अशा अजून कार्यशाळा आयोजित करणार आहोत, ज्या द्वारे सोशल मीडिया चा योग्य वापर होईल ,असे सांगितले. कार्यक्रमाचे संयोजन शिशिर पुराणिक यांनी केले.
या कार्यशाळेसाठी सुमारे ३० प्रशिक्षणार्थीना आपला सहभाग नोंदविला यामध्ये पत्रकार ,उद्योजक ,विद्यार्थी तसेच कलाकार यांचा समावेश होता.नॅशनल युनियन ऑफ जर्नलिस्ट्स महाराष्ट्र च्या अध्यक्षा शीतल करदेकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषांत सोशल मीडियाचा वापर योग्य प्रकाराने झाल्यास पत्रकारिताही चांगल्या दिशेने जाईल असे सांगितले .
दुसऱ्या सत्रामध्ये आजची शिक्षणपद्धती या विषयावर परिसंवाद घेण्यात आला यामध्ये डॉ. शिशिर पुराणिक ,अर्चना मवाळ ,शीतल करदेकर यांनी सहभाग घेतला तर पत्रकारितेतील आव्हाने या विषयावरील परिसंवादात सचिन चपळगावकर ,रायचंद शिंदे ,जितेंद्र जाधव ,श्रीकांत काकतिकर ,यांनी विचारमंथन केले . या कार्याक्रमामध्ये श्रीकांत काकतीकर यांचा बेळगाव जिल्ह्यातील युनियन च्या कार्याबद्दल विशेष सत्कार ज्येष्ठ पत्रकार दीपक मोहिते यांच्या हस्ते करण्यात आला .
या कार्यशाळा उपक्रमासाठी दीपक चव्हाण ,युनियन च्या खजिनदार वैशाली आहेर,सुषमा पाटील यांनी विशेष योगदान दिले या कार्यक्रमासाठी विजया मानमोडे ,तुषार शेंडे ,आदी पुणे जिल्ह्यातील पत्रकार उपस्थित होते.

Read more...

जुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन ? अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक

जुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी त मनोमिलन ?
– अतुल बेनके यांच्या नेतृत्वाचे कौतुक आणि अनुकूलता

सजग वेब टीम

जुन्नर | ऐन हिवाळ्यातही जुन्नर तालुक्यातील राजकीय वातावरण सध्या गरम आहे त्याच कारणही तसंच आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते आणि जुन्नर विधानसभा उमेदवारीसाठी इच्छूक असलेले अतुल बेनके यांच्यासाठी मात्र काही अनुकूल घटना घडताना दिसत आहेत.

काल परवा नारायणगाव याठिकाणी झालेल्या भव्य नोकरी महोत्सवात जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे यांनी चला हवा होऊ द्या आणि लकी ड्रॉ या विरोधकांच्या कार्यक्रमावर टिका करताना अतुल बेनके यांच्या कामाबद्दल मात्र तोंडभरून कौतुक करत त्यांची आमदारकीसाठी उमेदवारीच जाहीर केली. आता तालुक्यात ‘अतुलशेठची आता मात्र हवा झाली’ असे उद्गार ही काढले.

काळे बेनके मनोमिलन घडत असताना दुसरीकडे काँग्रेस कडूनही काही चांगले संकेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वाबद्दल येत आहेत. जुन्नर तालुका काँग्रेस चे अध्यक्ष अशोक घोलप यांनी पिंपळगाव सिध्दनाथ याठिकाणी कबड्डी स्पर्धेच्या जाहीर कार्यक्रमात “अतुलशेठ हाकेला ओ देणारा तरुण” असे उद्गार काढत बेनके यांचे कौतुक केले होते. आजही घोलप यांनी घाटघर याठिकाणी एका दशक्रिया विधी कार्यक्रमात “अतुल बेनकेही येथे उपस्थित आहेत आमच्या आय. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो” असा उल्लेख आपल्या श्रद्धांजलीपर भाषणात केला.

गेल्या काही दिवसांत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील जवळीक वाढताना दिसतेय त्यातच प्रमुख नेत्यांकडून काही सूचक विधानेही येऊ लागलीयेत. सत्यशील शेरकर यांना अतुल बेनके यांच्या सोशल मिडिया पेजकरून वाढदिवसानिमित्त देण्यात आलेल्या शुभेच्छा असो किंवा कारखान्याचे बेनके कुटुंबियांना दिलेले सभासदत्व असो या घटना येत्या काळात जुन्नर तालुका काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या मनोमिलनावर शिक्कामोर्तब करणाऱ्या ठरतील. सध्या राज्य पातळीवरील राजकीय वातावरण पाहता कदाचित दोन्ही पक्षनेत्यांवर वरिष्ठ पातळीवरून तशा पद्धतीचे आदेश ही देण्यात आले असण्याची शक्यता आहे.

Read more...

नॅनो तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – डॉ. सतीश ओगले ; साहेबराव बुट्टे पाटील स्मृती व्याख्यानमाला

नॅनो तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज – डॉ. सतीश ओगले 

सजग वेब टीम, बाबाजी पवळे

राजगुरूनगर | आज वेगाने विकसित होणाऱ्या नॅनो तंत्रज्ञानाने जीवनाचा प्रत्येक भाग व्यापण्यास सुरुवात केली असून  नॅनो  रोबटिक्स, विनाचालक कार, हवेत उडणाऱ्या तसेच विजेवर चालणाऱ्या कार, किडा-मुंगीच्या आकाराचे लहान रोबोट अशी वेगाने येऊन आदळणारी नवी तंत्रज्ञानं आपल्यासमोर येणार असून ती नुसती समजावून घेणं नाही तर ती लगेच आत्मसात करण्याचं कौशल्य प्रत्येकालाच दाखवावं लागेल असे वैज्ञानिक डॉ. सतीश ओगले यांनी सांगितले. ते हुतात्मा राजगुरू महाविद्यालयात आयोजित साहेबरावजी बुट्टेपाटील स्मृती व्याख्यानमालेत  नवविज्ञान व सामाजिक बदल या विषयावर बोलत होते.


या प्रसंगी जिल्हा न्यायाधीश एन. के. ब्रम्हे, सह दिवाणी न्यायाधीश वाय. जे. तांबोळी, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अॅड. देवेंद्र बुट्टेपाटील,  संचालक शांताराम घुमटकर, बाळासाहेब सांडभोर, अॅड.माणिक पाटोळे, अंकुश कोळेकर, उमेश आगरकरप्राचार्य डॉ. एस.बी. पाटील, उपप्राचार्य प्रा. जी. जी. गायकवाड,व्याख्यानमाला समितीच्या अध्यक्षा अॅड. राजमाला बुट्टेपाटील,प्रबंधक कैलास पाचारणे, ग्रामस्थ आणि उपस्थित होते.
नॅनो टेक्नॉलॉजीवर सध्या जगभरातून बरेचसे संशोधन चालू असून तिचा वापर जीवशास्त्र, जैविकशास्त्र, पर्यावरणशास्त्र,इलेक्ट्रॉनिक्स, सौंदर्य प्रसाधने आणि काही इतर क्षेत्रांमध्ये होतोआहे. उपलब्ध शेतजमिनीतून उत्पादन वाढविण्यासाठी क्षमतानॅनो तंत्रज्ञानामध्ये आहे. विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान, अवकाश तंत्रज्ञान, संगणक, नॅनो रोबोटिक्स, नॅनो तंत्रज्ञान, जैव तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रामधील घडणाऱ्या घडामोडी माहिती करून घेणे गरजेचे आहे कारण या तंत्रज्ञानाने माणसाचे आयुष्य अंतर्बाह्य बदललेले आहे. नॅनो तंत्रज्ञान असलेल्या एअरोजेल, ग्राफीन,कार्बन नॅनो ट्युब्ज  अशा क्षेत्रात भविष्यात उद्योग-व्यवसायाच्या दृष्टीने मोठी संधी आहे. मात्र  भाविष्यात विज्ञान व तंत्रज्ञानामुळे होणाऱ्या बदलांना सामोरे जाताना तशी उद्योगनिर्मिती देशात निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना ते म्हणाले की, तंत्रज्ञान आपल्याला माणसापासून दूर करणार नाही याची काळजी घ्यायला हवी. आज माणूस माणसाशी बोलण्याऐवजी मोबाईलशी अधिक बोलतो. मोबाईल आणि मिडीयाला इंटरनेट जोडले गेल्याने जगण्याच्या संवेदना व जाणिवा मल्टिमीडियाप्रमाणे बहुआयामी झालेल्या आहेत. दोन माणसांमधले अंतर कमी झाले असले, तरी दोन पिढ्यांमधले भावनिक अंतर प्रचंड वाढले आहे. चॅटच्या महापुरात संवादाचा अभाव आहे व कलेचे, कलात्मकतेचे व मानवी सांस्कृतिकतेचे निकष पूर्णपणे बदलले आहेत. प्रचंड सामर्थ्यशाली बनण्याच्या ध्यासात आता तंत्रज्ञानाने मानवी मनात प्रवेश केलेला आहे. त्या सामर्थ्यशाली तंत्रज्ञानाने आपला ताबा घेतला आहे. त्यासाठी माणसाने अंतर्मुख होऊन निसर्गाशी नाते जोडायला हवे. निसर्गातील दृश्यानुभावाची गंमत अनुभवायला हवी. विद्यार्थ्यांनी खूप वाचन करावे. कल्पकतेला महत्त्व द्यावे. प्रत्येक गोष्टीत विज्ञान असून ते समजून घेण्याची गरज व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. बी.डी.अनुसे यांनी केले. पाहुण्यांचा परिचय प्रा.ज्योती वाळूंज यांनी तर आभार कु. कंचन घुमटकर हिने मानले.

Read more...

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत विविध निर्णयांना मंजुरी

मंत्रिमंडळ बैठक निर्णय (२९/०१/२०१९)

1. लोक आयुक्तांच्या चौकशीच्या कार्यकक्षेत मुख्यमंत्री पदाचा समावेश करण्यास मान्यता.

2. गावातील मालमत्तांच्या कर आकारणी पद्धतीत सुधारणा करण्यासाठी मालमत्ता पत्रक तयार करण्याचा निर्णय.

3. उच्चदाब उपसा जलसिंचन योजनांना वीज दरात सवलत देण्यास मंजुरी.

4. अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील नव उद्योजकांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांना प्रकल्पाच्या कमाल 15 टक्के मार्जिन मनी देण्याचा निर्णय.

5. एकात्मिक नगर वसाहत प्रकल्पांसाठी शेतजमीन खरेदी करताना शेतजमीन धारणेच्या कमाल मर्यादेतून सूट देण्यासाठी महाराष्ट्र शेतजमीन अधिनियमात सुधारणेस मान्यता.

6. औद्योगिक वापरासाठी मंजूर केलेल्या शासकीय जमिनीचा वापर (नझूल जमिनी वगळून) अधिमुल्य आकारून इतर प्रयोजनासाठी करण्यास परवानगी. या निर्णयामुळे अशा प्रकारच्या जमिनी विकास प्रक्रियेत सामावून घेण्यास मदत होणार.

7. चंद्रपूर जिल्ह्यातील मूल येथे कृषि महाविद्यालय स्थापण्यास मान्यता.

8. मुंबई शहरात अतिरिक्त 5625 सीसीटीव्ही बसविण्यासाठी येणाऱ्या 323 कोटी खर्चास मान्यता. सीसीटीव्ही संनिरीक्षण प्रकल्पाच्या वाढीव खर्चासही सुधारित मान्यता.

9. वर्ष 2015 मध्ये पार पडलेल्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी 2015 च्या अधिनियमातील तरतुदी लागू होण्यासाठी सन 2018 चा महाराष्ट्र अधिनियम क्र. 66 मध्ये सुधारणा.

Read more...
Open chat
Powered by