विधानसभा लढविण्याचा कोणताही विचार नाही – पूर्वा वळसे पाटील

सजग वेब टिम, आंबेगाव

मंचर | महाराष्ट्रात आगामी विधानसभेच्या निवडणूका जस जशा जवळ येऊ लागल्या आहेत तस तशा राजकीय अफवांचा बाजार देखील उठला आहे. आढळराव पाटील यांचा मुलगा अक्षय आणि वळसे पाटील यांच्या कन्या पूर्वा यांच्यात विधानसभेचा सामना रंगण्याची शक्यता असल्याच्या बातम्यांनी आंबेगाव तालुक्यातील राजकिय वर्तुळात जोर धरलेला असतानाच पूर्वा वळसे पाटील यांनी याविषयीची आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

याच पार्श्वभूमीवर पूर्वा वळसे पाटील यांनी आपल्या ऑफिशियल ट्विटर च्या माध्यमातून अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले आहे.

त्यांनी केलेल्या ट्विट मध्ये

“महाराष्ट्रातील आगामी विधानसभेच्या निवडणुका लढविण्याच्या माझ्याबद्दल प्रसारित होणाऱ्या बातम्यांमध्ये कोणतीही सत्यता नाही. कृपया असे अंदाज केलेल्या कोणत्याही मीडिया अहवालाकडे दुर्लक्ष करा. धन्यवाद!
– पूर्वा वळसे पाटील.”

Share this post

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *


TALK OF THE TOWN